कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Sangli News | शिराळा तालुक्यात बिबट्याचा थरारक सापळा; दीड तासांत जेरबंद

01:59 PM Dec 12, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                               शिवरवाडी घरकुलात घुसलेल्या बिबट्याची मोठी धडपड

Advertisement

सांगली : सांगली जिल्हातील शिराळा तालुक्यात अतिशय थरारक अशी घटना घडली आहे. शिवरवाडी येथे नवीन घरकुलाच्या बांधकामात घुसलेला बिबट्या तब्बल दीड तासांच्या धडाकेबाज ऑपरेशननंतर वन विभाग आणि सह्याद्री रेस्क्यू वॉरिअर्सच्या पथकाने जेरबंद केला आहे. बिबट्याला पकडण्याचे थरारक दृश्य पाहण्यासाठी गावभरातून लोकांची झुंबड उडाली होती.

Advertisement

शिराळा तालुक्यातील शिवरवाडी येथे सकाळी सातच्या सुमारास अशोक बेंद्रे यांच्या नवीन बांधकाम सुरू असलेल्या घरकुलात बिबट्या बसल्याचे नाथा बेंद्रे यांनी पाहिलं आणि तात्काळ दरवाजे बंद करून वन विभागाला माहिती दिली.

वन विभागाचे अधिकारी लोखंडी सापळा, जाळे आणि रेस्क्यू उपकरणांसह घटनास्थळी पोहोचले. सह्याद्री रेस्क्यू वॉरिअर्सचे पथकही तातडीने दाखल झाले. फटाके फोडूनही बिबट्या हलत नसल्याने पथकाने काळजीपूर्वक बांबू व काठ्यांच्या सहाय्याने हेरगिरी सुरू केली.

सुमारे दीड तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर बिबट्या सुरक्षितरित्या सापळ्यात अडकला. त्यानंतर परिसरात एकच जल्लोष झाला. बिबट्याचा थरार पाहण्यासाठी गावासह पंचक्रोशीतील नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

पकडलेल्या बिबट्याला सायंकाळी चांदोली राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. शिवरवाडीतील या घटनेमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण पसरलं असलं, तरी वन विभागाच्या वेळेवर केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

Advertisement
Tags :
#BearRescue#CitizenAlert#LeopardCaught#RescueOperation#SafetyFirst#sanglinews#ShiralaTaluka#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia#WildlifeAlert#WildlifeRescueforestdepartment
Next Article