भारतीय संघाचा कसून सराव
वृत्तसंस्था / ग्वाल्हेर
भारतीय क्रिकेट संघाने अलिकडेच दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बांगलादेशचा व्हाईटवॉश केल्यानंतर आता उभय संघात 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना रविवार 6 ऑक्टोबर रोजी ग्वाल्हेरमध्ये होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडू कसून सराव करत आहेत. या सरावामध्ये प्रशिक्षक टी. दिलीप आणि सहाय्यक प्रशिक्षक डुश्चेटी यांनी क्षेत्ररक्षणावर अधिक भर दिला.
शुक्रवारी भारतीय संघातील खेळाडूंनी क्षेत्ररक्षणावर अधिक भर दिला होता. या सरावावेळी खेळाडूंना टी. दिलीप यांचे महत्वाचे मार्गदर्शन मिळाले असून अष्टपैलु हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती यांनी शारीरिक व्यायामावर अधिक भर दिला होता. या सरावावेळी प्रमुख प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी खेळाडूंना महत्वाच्या टिप्स दिल्या. कर्णधार सुर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, रवी बिश्नॉई यांनी झेल टिपण्याचा सराव केला. या मालिकेसाठी संजू सॅमसन आणि जितेश शर्मा यांना निवडण्यात आले आहे. या आगामी मालिकेतील दुसरा सामना 9 ऑक्टोबरला दिल्लीत तर तिसरा सामना 12 ऑक्टोबरला हैद्राबादमध्ये होईल.