नरकासुर रात्रीच्या होंड्यातील घटनेचा कसून तपास जारी
पोलिस महासंचालक आलोक कुमार यांची माहिती
पणजी : होंडा येथील नरकासुराच्या रात्री घडलेल्या घटनेचा पोलिस कसून तपास करीत आहेत, चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्वरित आरोपपत्र दाखल केले जाईल, असे आश्वासन पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी दिले आहे. सर्व दोषींना ताब्यात घेऊन लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी दोन्ही प्रकरणांचा जलद आणि कसून पाठपुरावा करण्यासाठी विभाग वचनबद्ध आहे, असे पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी सांगितले. काल शुक्रवारी पोलिस मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. म्हापसा दरोडा प्रकरणात पोलिस सातत्याने प्रगती करत आहेत. अनेक महत्त्वाचे पुरावे या आधीच गोळा केले गेले आहेत. आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे आणि प्राथमिक तपासात त्यांचा या गुह्यात थेट सहभाग असल्याचे दिसून आले आहे. तपास जसजसा पुढे जाईल तसतसे आणखी काहीजणांना अटक होण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.