For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli : कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी फाट्याजवळ कॅनॉलमध्ये मोटारसायकलचा भीषण अपघात

01:06 PM Nov 16, 2025 IST | NEETA POTDAR
sangli   कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी फाट्याजवळ कॅनॉलमध्ये मोटारसायकलचा भीषण अपघात
Advertisement

                        कवठेमहांकाळ तालुक्यातील भीषण अपघात

Advertisement


कवठेमहांकाळ
: कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी फाट्याजवळील रेल्वे क्रॉसिंगजवळ असलेल्या कॅनॉलमध्ये मोटारसायकल सह पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास घडली असून शनिवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेची कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, विनायक श्रीमंत साळुंखे (वय ४५ रा. कांचनपूर ता.) मिरज असे मृत व्यक्तीचे नाव असून ते जतवरून काम संपवून शाईन मोटारसायकल (क्रमांक एम एच १० इ एम २३५०) घेऊन कवठेमहांकाळकडे येत होते त्यावेळी रांजणी फाट्याजवळ रेल्वे क्रॉसिंगजवळ एक शाळा आहे. तिथेच वळणावर एक कॅनॉल आहे, या कॅनॉलमध्ये मोटरसायकल वरील नियंत्रण सुटल्याने विनायक साळुंखे हे थेट मोटारसायकलसह कॅनॉलमध्ये पडले.

Advertisement

यावेळी त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा मृत्यू शुक्रवारी रात्री ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास घडला असण्याचा अंदाज असून शनिवारी सकाळी येथून जाणाऱ्या नागरिकांना मोटारसायकल पाण्यात पडलेली दिसली. त्यामुळे घटना उघडकीस आली. घटनास्थळी सकाळी कवठेमहांकाळ पोलिसांनी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय कवठेमहांकाळ येथे आणण्यात आला. अधिक तपास कवठेमहांकाळ पोलिस करत आहेत.

Advertisement
Tags :

.