देवीच्या हजाराहून अधिक मूर्ती असणारे मंदिर
प्रत्येक मूर्तीचे डिझाइन आहे वेगळे
जगात चमत्कारी मंदिर केवळ भारतातच नाहीत. जपानच्या क्योटो येथील एक मंदिर स्वत:च्या चमत्कारी उपचारासोबत अनोख्या एक हजाराहून अधिक सुंदर मूर्तींसाठी ओळखले जाते. संजूसांगेन-डो मंदिर 1164 साली निर्माण करण्यात आले होते, यातील प्रत्येक मूर्ती दयेची देवी कन्नन यांची आहे. मंदिराच्या नावाचा अर्थ ‘स्तंभांदरम्यान 33 रिक्त स्थान असलेला हॉल’ असा होतो, जे याच्या अनोख्या संरचनेला दर्शवितात. लोक येथील मूर्तींची विशाल संख्या पाहून चकित होत असतात.
क्योटोमधील संजूसांगेन-डो एक बौद्ध मंदिर असून ते मूर्तींच्या स्वत:च्या प्रभावशाली संग्रहासाठी ओळखले जाते. अधिकृतपणे रेंगेओ-इन संबोधिल्या जाणऱ्या या मंदिराचा इतिहास समृद्ध आहे आणि याची अनोखी वैशिष्ट्यो याला एक दर्शनीय स्थळाचे स्वरुप प्राप्त करून देतात. संजूसांगेन-डो नाव इमारतीच्या वास्तुकलेला दर्शविते, ज्याच्या स्तंभांदरम्यान 33 रिक्त स्थान असून ज्यात मूर्ती 10 रांगांमध्ये आणि 50 स्तंभांमध्ये व्यवस्थित आहेत.
1164 साली सम्राट गो-शिराकावा यांच्या आदेशावर या मंदिराची निर्मिती करण्यातआली होती. आग लागल्याने मूळ वास्तू नष्ट झाल्यावर 1266 मध्ये पुन्हा याची निर्मिती करण्यात आली. 120 मीटर लांब संजूसांगेन-डो जपानमध्ये सर्वात लांब लाकडाची संरचना आहे. संजूसांगेन-डोमध्ये ठेवण्यात आलेल्या मूर्तींची संख्या अधिक असण्यासोबत त्या जटिल स्वरुपाने डिझाइन करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचे खोल धार्मिक महत्त्व देखली आहे.
मंदिराची मध्यवर्ती स्थानातील मूर्ती एक मोठी आणि बसलेल्या हजार सशस्त्र कन्न आहेत, ज्याच्या दोन्ही बाजूला 500 उभ्या कन्नन देवीच्या मूर्ती आहेत. ही मध्यवर्ती आकृती जपानी बौद्धकलेची एक उत्कृष्ट कलाकृती आडहे. मूर्ती जपानी सायप्रसच्या लाकडाद्वारे तयार करण्यात आल्या आहेत. सामग्रीच्या या पर्यायामुळे शतकांपासून मूर्तींना संरक्षित करण्यास मदत मिळाली आहे.
अनेक मूर्तींवर सोन्याचे आच्छादन देण्यात आल्याने त्यांना चमकदार स्वरुप प्राप्त झाले आहे. हे सोन्याचे आवण्रा कन्नन देवीच्या दिव्य स्वरुपाचे प्रतीक आहे. मूर्तींची मोठी संख्या असूनही प्रत्येक मूर्तीत एक अद्वितीय वैशिष्ट्या आहे. कन्नन देवी गरजूंची मदत करण्यासाठी अनेक रुप धारण करू शकते असा विश्वास याद्वारे भाविकांना मिळत असतो. मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्याला जपानच नव्हे तर पूर्ण जगात प्रसिद्ध करणारे आहे. तोशिया नावाची वार्षिक तिरंदाजी स्पर्धा येथे आयोजित केली जाते. हे आयोजन एदो काळापासून होत आले आहे आणि पूर्ण जपानमधील तिरंदाजांना ही स्पर्धा आकर्षित करत असते.