मनाला शांती मिळवून देणारे मंदिर
जंगलात वसलेल्या मंदिराने दिली ऑफर
जगात प्रत्येक माणूस पैसे आणि नावलौकिकाच्या मागे धावत आहे. ज्याला या दोन्ही गोष्टी प्राप्त होतात, त्याला केवळ समाधान आणि मनशांतीचा शोध असतो. माणूस जितका प्रगती करत जातो, मानसिक शांती तितकीच त्याच्यापासून दूर जात असते. यंत्रांना झिडकारून पुन्हा जुन्या काळातील गोष्टी जगण्याची इच्छा लोकांमध्ये वाढत आहे.
सद्यकाळात तणावयुक्त धावपळीने भरलेल्या जगात लोक केवळ मनशांती इच्छितात. अशा स्थितीत याची कुणी हमी दिली तर तेथे कोण जाणार नाही. चीनमध्ये एका बौद्ध मंदिराकडून अशी ऑफर दिली जात आहे. शतकांपेक्षा जुन्या या मंदिराकडू लोकांना सात दिवसांच्या एका खास कार्यक्रमासाठी बोलाविले जात आहे.
तर मोबाइल सोडून या
चीनमध्ये एक 1700 वर्षे जुने मंदिर असून याचे लिनग्यिन टेम्पल आहे. याचा अर्थ मनाला शांती देणारे मंदिर असा होतो. जेजियांग प्रांतात असलेल्या या मंदिराकडून 23-30 वयोगटातील लोकांना एक आठवड्याच्या कार्यक्रमाची ऑफर दिली जात आहे. याच्या अंतर्गत त्यांना जंगलातील जीवनाचा अनुभव दिला जात आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत संबंधितांना सर्वोत्तम अनुभव प्राप्त होईल, परंतु याकरता एक अट ठेवण्यात आली आहे. यानुसार संबंधित व्यक्तीला स्वत:चा मोबाइल सोडून यावे लागणार आहे. कार्यक्रमापूर्वी हा मोबाइल जमा करावा लागेल आणि अखेरीस तो परत मिळणार आहे.
जंगलाचा अनुभव घ्या
मंदिराकडून राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी लोकांना निर्देशांचे पालन करावे लागेल. तसेच स्वत:च्या मर्जीनुसार काहीच करता येणार नाही. मंदिर पर्वतीय भागात असून घनदाट जंगलाने वेढलेले आहे. या मंदिरात काही लोक स्वयंसेवक म्हणून देखील काम करत आहेत. एक आठवड्यात तणावापासून बऱ्याचअंशी मुक्ती मिळाल्याचे येथे येणाऱ्या लोकांचे सांगणे आहे. हे मंदिर शहरी भागापासून 1600 किलोमीटर दूर असल्याने येथे शांततेची कुठलीच कमतरता नाही.