ज्वालामुखीय पर्वतावरील मठ
पायऱ्या चढणे अत्यंत अवघड
भारतात उंच पर्वतांवर मंदिर असणे सामान्य बाब असून तेथे जाण्यासाठी अनेक पायऱ्या चढाव्या लागतात. परंतु म्यानमारमध्ये अशाच प्रकारचा एक बौद्धमठ आहे. खास बाब म्हणजे ताउंग कलात मठ एक विलुप्त ज्वालामुखीय पर्वतावर स्थापन करण्यात आला आहे. ताउंग कलात मठ वास्तुकला आणि अध्यात्मिकतेचा एक चमत्कार आहे. हा मठ जगभरातील पर्यटकांना आकर्षित करत असतो. 777 पायऱ्या चढून या पवित्र स्थानी पोहोचता येते. तेथे भिक्षूंचे वास्तव्य आहे. हा मठ केवळ एक धार्मिक स्थळ नसून इतिहास, संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्याच्या माध्यमातील एक यात्रा आहे.
ताउंग कलात मठ म्यानमारच्या माउंट पोपावर स्थित आहे. हा एक विलुप्त ज्वालामुखी आहे. मठ एका ज्वालामुखी प्लगवर निर्माण करण्यात आला आहे. ताउंग कलातचा बर्मी भाषेतील अर्थ ‘पेडस्टल हिल’ असा होतो. हे नाव मठाच्या अद्वितीय स्थानाला दर्शविते. मठ इतिहास आणि स्थानिक कहाण्यांमुळे चर्चेत असतो. म्यानमारच्या सांस्कृतिक वारशात रस असलेल्या लोकांसाठी हे एक आकर्षक स्थान आहे. बर्मी पौराणिक कथांमध्ये ताउंग कलातला 37 आत्म्यांचे घर मानले जाते. या आत्म्यांची पूजा बौद्ध देवतांसोबत केली जाते. स्थानिक एनिमिस्ट परंपरांना बौद्ध धर्माशी हा प्रकार जोडणारा आहे.
मठाची निर्मिती 11 व्या शतकात झाली होती. याची निर्मिती बुतपरस्त साम्राज्याचे संस्थापक राजा अनावराता यांनी आत्म्यांचा सन्मान करणे आणि त्यांना बौद्ध धर्मात एकीकृत करण्यासाठी करविली होती. माउंट पोपा एका शक्तिशाली भूकंपामुळे निर्माण झाला होता. भूकंपाने पर्वताला विभागले होते, ज्यामुळे ज्वालामुखी प्लग निर्माण झाला, जेथे आता ताउंग कलात आहे.
ताउंग कलात मठाची वास्तुकला याच्या निर्मात्यांचे कौशल्य आणि समर्पणाचा पुरावा आहे. ज्यात जटिल डिझाइन आणि आकर्षक शिल्पकौशल्य सामील आहे. मठ सोन्याने नटलेला असून चमकणाऱ्या सोन्याचा बाहेरील हिस्सा सूर्यप्रकाशात चमकत असल्याने हा मठ अनेक मैल अंतरावरून दिसतो. मठात अनेक मंदिरे आणि मूर्ती आहेत. यात बुद्ध, विभिन्न नट (आत्मा) आणि अन्य धार्मिक आकृत्यांच्या मूर्ती सामील आहेत. यातील प्रत्येकाचे स्वत:चे असे महत्त्व आहे. ताउंग कलात मठ केवळ धार्मिक आणि अध्यात्मिक स्थळ नसून याच्या आसपासचे क्षेत्र नैसर्गिक सौंदर्य आणि वन्यजीवनाने समृद्ध आहे. यामुळे हे आकर्ष क पर्यटनस्थळ ठरते.