सहस्र मूर्तींचे मंदीर
भारत हा मंदिरांचा देश आहे. येथे विविध प्रकारची मंदिरे आहेत. तथापि, भारताप्रमाणे आशिया खंडातील इतर देशांमध्येही मंदिरे आहेत आणि त्यांच्यापैकी कित्येक मंदिरे अद्भूत आहेत. जपानच्या क्योटो बेटावरील ‘संजुसांगेन डो’ नामक एक मंदीर संस्कृती आणि इतिहास यांचा संगम म्हणून प्रसिद्ध आहे. भक्तांचे शारीरीक विकार दूर करण्याची अद्भूत शक्ती या मंदिरात आहे, अशी भावना आहे. हे मंदिर त्याच्या तीरंदाजी स्पर्धेसाठीही जगप्रसिद्ध आहे. तथापि, या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्या असे आहे, की येथे एकाच देवतेच्या 1001 मूर्ती आहेत. ‘कन्नन’ असे या देवतेचे नाव असून ती दयेची देवता म्हणून प्रसिद्ध आहे.
या मंदिराची रचना इसवी सन 1,164 मध्ये करण्यात आली होती. याचाच अर्थ असा की ते साधारणत: 900 वर्षांपूर्वीचे आहे. कन्नन या दया देवतेच्या 1001 मूर्तींपैकी प्रत्येक मूर्ती अन्य मूर्तींपेक्षा भिन्न आहे. या सर्व मूर्ती विशेष जपानी लाकडापासून निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यांची देखभाल उत्तम रितीने केल्याने त्या 900 वर्षांच्या नंतरही त्यांच्या मूळ स्थितीत आहेत. त्या निर्माण करण्यात आल्या आहेत. जपानचा इतिहासकालीन सम्राट गो-शिराकावा याच्या आदेशावरुन या मंदिराचे निर्माणकार्य करण्यात आले आहे. या मंदिराचे वास्तूशिल्प अप्रतिम आहे, अशी प्रशंसा पर्यटक करतात. या मंदिराच्या वतीने प्रत्येक वर्षी आयोजित करण्यात येणारी ‘तोशिया’ नामक तीरंदाजी स्पर्धा जगभरात प्रसिद्ध आहे. ही स्पर्धा 800 वर्षांपासून आयोजित केली जाते. ती जगातील सर्वात जुन्या तिरंदाजी स्पर्धांपैकी एक मानली जाते. संपूर्ण जपानमधून उत्कृष्ट तीरंदाज या स्पर्धेत भाग घेण्यासाठी येतात. ही संधी मिळणे प्रतिष्ठेचे मानले जाते.