For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लखनौसमोर आज प्रबळ कोलकाता नाइट रायडर्सचा धोका

06:40 AM May 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
लखनौसमोर आज प्रबळ कोलकाता नाइट रायडर्सचा धोका
Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

Advertisement

आयपीएल प्लेऑफच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाइट रायडर्स या दोन संघांमध्ये आज रविवारी सामना होणार असून प्रबळ कोलकाता नाइट रायडर्सविऊद्ध विजय मिळवण्यासाठी लखनौला अव्वल दर्जाचा खेळ करावा लागणार आहे. मुंबई इंडियन्सवर 24 धावांनी विजय मिळवून दुसऱ्या स्थानावर पोहोचलेल्या केकेआरचे 14 गुण झाले असून प्ले ऑफसाठी पात्र ठरण्याच्या दृष्टीने ते आणखी एक पाऊल जवळ पोहोचले आहेत. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाकडून असलेल्या धोक्यावर मात करण्याचा दबाव लखनौचा कर्णधार राहुलवर असेल.

लखनौ सुपर जायंट्स सहा विजय आणि चार पराभवांसह 10 सामन्यांतून 12 गुण मिळवून तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सनरायझर्स हैदराबाद (12 गुण) चौथ्या स्थानावर, त्यानंतर धोकादायक चेन्नई सुपर किंग्ज (10 गुण) आणि दिल्ली कॅपिटल्स (10 गुण) असल्याने आणि अंतिम चार संघांसाठीची शर्यत तीव्र झाल्याने एलएसजी कोंडीत सापडणे टाळण्याचा प्रयत्न करेल. कर्णधार राहुल आणि अष्टपैलू मार्कस स्टॉइनिस हे एलएसजीचे प्रमुख खेळाडू आहेत आणि मागील सामन्यात डावाची सुऊवात केलेल्या युवा अर्शिन कुलकर्णीच्या जागी दक्षिण आफ्रिकेच्या अनुभवी क्विंटन डी कॉकला परत आणले जाते की नाही हे पाहावे लागेल.

Advertisement

निकोलस पूरननेही सातत्याने मोलाचे योगदान दिले आहे, परंतु मुंबई इंडियन्सविऊद्धच्या संघर्षानंतर एलएसजीच्या एकूण फिनिशिंग कौशल्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांच्या आयुष बडोनीने या आयपीएलमध्ये कमी धावा केल्या आहेत आणि तो आपली कामगिरी सुधारण्यास उत्सुक असेल. एलएसजीच्या गोलंदाजांनाही यावेळी कठोर परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. वेगवान गोलंदाज मयंक यादवशिवाय त्यांना या सामन्यातही उतरावे लागण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत 11 पैकी फक्त तीन सामने गमावलेलेल्या केकेआरला रोखणे ही काही सामान्य गोष्ट नाही. मात्र पंजाब किंग्जने त्यांच्याविऊद्ध आयपीएलमधील सर्वांत मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरच्या गोलंदाजीतील त्रुटी उघड्या पाडल्या होत्या. परंतु अय्यरचा संघ त्यानंतर दोन प्रभावी विजयांसह त्या धक्क्यातून सावरला. केकेआरने नुकताच मुंबईलाही दणका दिलेला असला, तरी त्यांच्या फलंदाजीचे कच्चे दुवे त्यात उघडे पडले होते. त्यामुळे फलंदाजीत अधिक चांगली कामगिरी करण्याचे लक्ष्य आज संघ बाळगेल.

संघ : लखनौ सुपर जायंट्स : के. एल. राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, दीपक हुडा, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरनकृणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसीन खान, शमर जोसेफ, यश ठाकूर, मणिमारन सिद्धार्थ, प्रेरक मंकड, अर्शद खान, कृष्णप्पा गौतम, अमित मिश्रा, काइल मेयर्स, अॅश्टन टर्नर, मॅट हेन्री, नवीन-उल-हक, देवदत्त पडिक्कल, युद्धवीरसिंह चरक, मयंक यादव, अर्शीन कुलकर्णी.

कोलकाता नाईट रायडर्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), के. एस. भरत, रेहमानउल्ला गुरबाज, रिंकू सिंग, अंगक्रिश रघुवंशी, शेरफेन रदरफोर्ड, मनीष पांडे, आंद्रे रसेल, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, अनुकुल रॉय, रमणदीप सिंग, वऊण चक्रवर्ती, सुनील नरेन, वैभव अरोरा, चेतन साकारिया, हर्षित राणा, सुयश शर्मा, मिचेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, साकिब हुसेन, मुजीब उर रेहमान, गस अॅटकिन्सन, गझनफर, फिल सॉल्ट.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.

Advertisement
Tags :

.