विषारी मातीतील धातू खाणारा अजब प्राणी
त्याच्या मलात असतात 24 कॅरेटचे छोटे-छोटे कण
सोने जगातील सर्वात मूल्यवान धातू मानला जातो, काही दुर्लभ धातू सोन्यापेक्षाही महाग असतात. परंतु सोन्याच्या लोकप्रियतेसमोर ते टिकत नाही. सोने पृथ्वीच्या गर्भात मिळते, काही ठिकाणी हे नदीच्या तळात देखील मिळते. एका चकित करणाऱ्या शोधात वैज्ञनिकांना विषारी मातीत आढळून येणारा एक सुक्ष्मजीव धातू खातो आणि 24 कॅरेट सोन्याचे कण शरीराबाहेर काढत असल्याचे दिसून आले आहे.
पृथ्वीच्या सर्वात विषारी कोपऱ्यात राहणारा हा अजब जीव कप्रीएविडस मेटालिड्यूरन्स आहे. हा सुक्ष्मजीव अशा विषारी मातीत आढळून येतो, जो भारी धातूंनी भरलेला असतो. हा जीव या धातूंना फस्त करतो आणि सोन्याचे छोटे कण उत्सर्जित करतो. यासंबंधीचा शोध ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीच्या वैज्ञानिकांनी लावला आहे. हा सुक्ष्मजीव कशाप्रकारे काम करतो, हे त्यांनी शोधले आहे. हा जीव विषारी धातूंपासून वाचण्यासाठी रक्षा तंत्र तयार करतो, सोने आणि तांब्यासारखे धातू सर्वसाधारणपणे याला मारू शकतात. परंतु हा मायक्रोब या धातूंना निष्क्रीय करतो.
हा जीव एक रासायनिक प्रक्रिया सुरू करतो. यामुळे याच्या शरीरावर सोन्याचे कण तयार होता. हा निसर्गाचा अलकेमिस्ट सारखा आहे. हा विषारी पदार्थाला चमकत्या सोन्यात बदलतो. या जीवाचे मेटाबॉलिज्म अत्यंत खास आहे. हा विषारी वातावरणात जिवंत राहतो. याच्या जीनमध्ये धातू-प्रतिरोधक तंत्र असून हे विषारी पदार्थांना निष्क्रीय करते.
खास एन्झाइम
जेव्हा याला सोन्याचे आयन मिळतात, तेव्हा तो सीओपीए आणि सीयूपीए यासारखे एंझाइम तयार करतो. हे एंझाइम धातू उत्सर्जन तंत्राचा हिस्सा आहेत. ते सोन्याच्या आयन्सना कमी करतात, यामुळे नॅनोकण तयार होतात. हे कण मायक्रोबच्या बाहेर पडतात. ही प्रक्रिया या जीवाला जिवंत ठेवते. हा मायक्रोब खननाचे स्वरुप बदलू शकतो. सोन्याचे खनन अत्यंत हानिकारक मानले जाते, त्यामुळे पर्यावरणाला नुकसान पोहोचते. यात मोठी ऊर्जा लागते. परंतु या सुक्ष्मजीवाकडून प्रेरणा घेत वैज्ञानिक बायोमिमेटिक खनन विकसित करू शकतात. ते बायो-रिअॅक्टर किंवा इंजिनियर्ड मायक्रोब तयार करू शकतात. ई-कचरा, खाणींचे अवशेष किंवा कमी गुणवत्तायुक्त अयस्कमधून ते सोने मिळवू शकतात.