महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रांताधिकारी,नायब तहसीलदारांना निवेदन

05:39 PM Dec 07, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी |  प्रतिनिधी

Advertisement

शेतकऱ्यांच्या विविध मागण्या वारंवार शासनाकडे देऊनही शासन त्यावर गांभीर्याने निर्णय घेत नाही.यासाठी भारतीय किसान संघाच्या वतीने सावंतवाडी व कुडाळ प्रांताधिकारी यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले. या निवेदनामध्ये वन्यप्राणी , पक्षी, यांच्या कडून होणाऱ्या पिकाच्या नुकसानीची १००%भरपाई सरकारने करावी अन्यथा त्यांच्यापासून संरक्षण( आवश्यक तर प्राणी हत्या) करण्याचे अधिकार शेतकऱ्याला द्यावेत. अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली . प्रामाणिक कर्जदार शेतकऱ्यांना जाहिर करण्यात आलेले प्रोत्साहन अनुदान ₹५००००/- अद्याप मिळालेले नाही ते तात्काळ जमा करावे. वीज बिल आकारणी मध्ये अनागोंदी असल्याने एकवेळ वीजबिल सरसकट माफ करावे तसेच अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत केंद्र सरकार कडून मिळणारे वीज पुरवठा अनुदान व त्याचा विनियोग यावर श्वेत पत्रिका काढावी.मागेल त्याला विनाअट ९०%अनुदानावर सौर शेतीपंप योजना उपलब्ध करून द्यावी.यासह एकुण 12 मागण्यांचे निवेदन सिंधुदुर्गात सावंतवाडी प्रांताधिकारी श्री.प्रशांत पानवेकर व कुडाळ नायब तहसीलदार श्री.प्रदिप पवार यांना  देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष श्री तानाजी सावंत ,उपाध्यक्ष श्री सुर्यकांत कुंभार, जिल्हा व तालुका कार्यकारिणी सदस्य मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat news # sawantwadi #
Next Article