महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

खानापुरातील शेतकऱ्यांकडून आज मुख्यमंत्र्यांना निवेदन

10:38 AM Dec 06, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कक्केरी येथील शेतकऱ्यांचा जनजागृती करून मोर्चाला जाण्याचा निर्धार : विविध मागण्यांसाठी तालुक्यातील शेतकरी एकवटणार

Advertisement

वार्ताहर /नंदगड

Advertisement

खानापूर तालुक्मयातील शेतीकरीता व पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी मलप्रभा नदीला ठिकठिकाणी बंधारे बांधून कालव्याद्वारे पाणी देण्याची योजना राबवावी, अशी मागणी करणारे निवेदन खानापूर तालुक्मयातील शेतकऱ्यांकडून व शेतकरी संघटनेतर्फे बेळगाव येथील अधिवेशनात बुधवार दि. 6 रोजी मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांना देण्यात येणार आहे. यासंदर्भात कक्केरी येथे शेतकऱ्यांची सोमवारी सभा घेण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सभेला अनेक शेतकरी व महिला सभेला उपस्थित होत्या. त्यानंतर गावात यासंबंधी जनजागृती करण्यात आली. शेतकऱ्यांना निवेदन देण्यासाठी मोठ्याप्रमाणात उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले. खानापूर-यल्लापूर राज्य मार्गावर ठिकठिकाणी ख•s पडले आहेत. त्यामुळे सदरचा रस्ता नादुऊस्त झाला आहे. या रस्त्याची दुऊस्ती व्हावी. तसेच तालुक्मयातील संपर्क साधणाऱ्या गावांना जोडण्यात येणाऱ्या नादुऊस्त रस्त्यांची दुऊस्ती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करा

शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे. अरण्य प्रदेशात करण्यात येणाऱ्या शेतीचे हक्कपत्र शेतकऱ्यांना देण्यात यावे. जंगली जनावरांकडून भात व ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून जास्तीत जास्त नुकसानभरपाई देण्यात यावी, आदींसह अन्य मागण्या करण्यात येणार आहेत. सोमवारी कक्केरी गावात निवेदन देण्यासाठी गावातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी अधिवेशन स्थळी उपस्थित रहावे, यासाठी जनजागृती करण्यात आली. शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशाही घोषणा यावेळी देण्यात आल्या.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article