लाल रंगाचे पाणी असणारा झरा
जगातील अनेक नैसर्गिक स्थळं ही स्वत:ची अनोखी स्थिती आणि वैशिष्ट्यांमुळे प्रसिद्ध असतात. परंतु काही स्थळांसोबत कहाण्या जन्माला येत असतात. असाच प्रकार एका अरुंद खोऱ्यात वाहणाऱ्या नदीसोबत घडला आहे. यामुळे येथील हे पात्र आता जादुई झरा म्हणून प्रसिद्ध झाले आहे. या ठिकाणी वाहणारे पाणी लाल रंगाचे दिसते.
स्कॉटलंडमध्ये लोच लोमोंड वॉटरफ्रंटमध्ये असलेल्या धबधब्याचे नाव डेविल्स फलपिट आहे. हा स्वत:च्या आसपासच्या भागांमध्ये जादुई गुणधर्म असलेल्या झऱ्याच्या स्वरुपात ओळखला जातो. याच्या पाण्याचा रंग लाल असतो. प्रत्यक्षात याचा रंग लाल नसतो. डेविल पलफिट एका मशरुमच्या आकाराचा मोठा दगड असून तो नदीच्या तळातून छोट्या झऱ्याखालून निघाला आहे. या खोऱ्याचे ख्घ्रे नाव फिनिच ग्लेन आहे, परंतु लोक या ठिकाणाला डेविल पलफिट म्हणूनच ओळखतात. या नदीच्या खाली लाल रंगाचे बलुआ खडक असल्याने याचे पाणी लाल रंगाचे दिसून येते, प्रत्यक्षात पाण्यात कुठल्याही प्रकारचा रंग मिसळलेला नसतो.
पात्राखाली आकर्षक लाल दगड असल्याने पाणी लाल रंगाचे दिसू लागते. यावरून एक कहाणी देखील आहे. सैतान स्वत:च्या अनुयायांना याच खडकावर संबोधित करायचा कारण त्याच्याखाली लाल रंगाचे पाणी वाहते अशी ही कथा आहे. आता हे छोटेसे खोरे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.
येथे पोहोचणे सोपे नाही, कारण येथील वाट अत्यंत घसरगुंडीयुक्त आहे. या मार्गाला डेविल्स स्टेप किंवा जॅकब्स लॅडर देखील म्हटले जाते. येथे मदतीसाठी दोरखंडही लावण्यात आले आहेत. एक पर्यटन स्थळ म्हणून लोकांकडून याचे कौतुक केले जात आहे.