For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आंजणारी घाटात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रेलरची कारला धडक

12:42 PM Sep 20, 2024 IST | Abhijeet Khandekar
आंजणारी घाटात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रेलरची कारला धडक
speeding trailer collided with car Anjawari Ghat
Advertisement

अपघातात भाऊ बहीण जखमी; ट्रेलर चालकावर गुन्हा दाखल

Advertisement

लांजा प्रतिनिधी

भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रेलरने कारला धडक दिल्याने कारमधील दोन लहान भाऊ बहीण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी १९ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर आंजणारी घाटात घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजित के. रविंद्रन (वय ३७, राहणार अंधेरी ईस्ट मुंबई) हे आपल्या ताब्यातील एमजी एस्टर कार क्रमांक (एम.एच.१० डीटी ३३३४) घेऊन मुंबईच्या दिशेने चालले होते. या कारमध्ये दोन कुटुंबातील आठजण प्रवास करत होते. सकाळी ८.३० च्या सुमारास कार मुंबई गोवा महामार्गावर आंजणारी घाटी येथे आली असता मुंबईहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रेलर क्रमांक (एम.एच ४६, बीएफ ६३९४) ने एस्टर कारला धडक दिली. हा ट्रेलर राम आशिष (वय २५, राहणार बबनपुरवा तालुका उत्तरवाला, जिल्हा बलरामपुर, उत्तर प्रदेश ) हा चालवत होता. ट्रेलरने दिलेल्या धडकेत कार मधील गौरी एम.साजिश (वय १०) आणि जियान एम.साजिश (वय ५) दोन्ही राहणार नाशिक ओझर एअरफोर्स हे जखमी झालेत.

Advertisement

महामार्गाच्या उताराच्या परिस्थितीकडे लक्ष न देता ट्रेलर हा अविचाराने व भरधाव वेगाने चालवून अपघात केल्याप्रकरणी पोलिसांनी ट्रेलर चालक राम आशिष याच्यावर भारतीय न्याय संहिता क्रमांक २८१, १२५(अ), मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे हे करत आहेत.

Advertisement
Tags :

.