महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भरधाव कारची औषध दुकानाला धडक

10:46 AM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आधी खांबाला आदळल्याने मोठी दुर्घटना टळली : अद्याप एफआयआर दाखल नाही

Advertisement

बेळगाव : भरधाव कारची औषध दुकानाला धडक बसून कारचालकासह पाच जण जखमी झाले. शनिवारी मध्यरात्री चन्नम्मा सर्कलजवळील गणेश मंदिरामागील वेलनेस या औषध दुकानासमोर ही घटना घडली आहे. या घटनेत कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे. शनिवारी मध्यरात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. धर्मवीर संभाजी चौकहून शाहूनगरकडे जाणारी केए 22, झेड 8320 क्रमांकाची कार चालकाचे नियंत्रण सुटून औषध दुकानाच्या प्रवेशद्वारावर आदळली.सिमेंटच्या खांबावर आदळल्यामुळे प्राणहानी टळली. अन्यथा कार थेट दुकानात शिरली असती.

Advertisement

या अपघातात कारचालक,दोन ग्राहक व औषध दुकानातील दोन कर्मचारी असे पाच जण जखमी झाले आहेत. कारचालक राजशेखर भरमू मल्लण्णवर (वय 22) रा. शाहूनगर, शिवानंद कडबी (वय 22) रा. नेहरूनगर, राजू महांतशेट्टी, रा. गणेशपूर, सिद्धू पुजारी (वय 21) रा. कणबर्गी रोड, योगेश काळे (वय 25) रा. सदाशिवनगर अशी जखमींची नावे आहेत. कारचालक राजशेखरवर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. उर्वरित चौघा जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. घटनेची माहिती समजताच वाहतूक दक्षिण विभाग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यासंबंधी रविवारी रात्री वाहतूक पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता अद्याप एफआयआर दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article