कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भरधाव कारने 9 वाहनांना चिरडले, चालकाचा मृत्यू

11:01 AM Mar 16, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

 भरधाव कारवरील वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास टेंबलाई नाका उड्डाणपुल परिसरात भिषण अपघात झाला. भरधाव कारने रस्त्याकडेला लावलेल्या नउ दुचाकींचा चुराडा केला. या अपघातामध्ये कारचालक आणि बुलडोझर व्यावसायीक धीरज शिवाजीराव पाटील सडोलीकर (वय 55, रा. राजारामपुरी, नववी गल्ली, मूळगाव सडोली खालसा ता. करवीर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे ते चुलत पुतणे होते.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी की, धुळवडीनिमीत्त शुक्रवारी रात्री धीरज पाटील हे ताराबाई पार्क येथे मित्रांसोबत जेवायला गेले होते. घरी परत जाताना टेंबलाई नाका उड्डाणपुलाजवळ वळण घेऊन राजारामपुरीच्या दिशेने जाताना त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. प्रचंड वेगाने आलेल्या कारने रस्त्याकडेच्या सात दुचाकी आणि दोन रिक्षा उडवल्या. त्यानंतर फुटपाथला धडकून कार थांबली. कारच्या धडकेमुळे रात्री मोठा आवाज झाला तसेच गाडीचे सेंटर लॉक वाजत राहिल्याने परिसरातील नागरिक खडबडून जागे झाले. त्यांनी या घटनेची माहिती राजारामपुरी पोलीसांना दिली. जखमी अवस्थेतील पाटील यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त वाहने हटवली. खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान पाटील यांचा मृत्यू झाला. याबाबत पोलिस हवालदार दिगंबर दगडू कुंभार (वय 55) यांनी फिर्याद दिली. बेदरकारपणे वाहन चालवल्याबद्दल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलडोझर व्यावसायीक म्हणून धीरज पाटील हे महाराष्ट्रासह अनेक राज्यांत प्रसिद्ध होते. त्यांचे वडील एस. डी. पाटील हे देखील याच व्यवसायात होते. आता हा व्यवसाय कमी झाल्यावर त्यांनी बंगळुरू परिसरात पवनचक्की उद्योगात चांगलाच जम बसवला होता. दिवंगत नेते पी. एन. पाटील यांच्या विधानसभा निवडणुकीत ते सक्रिय असत.

टेंबलाई नाका उड्डाणपूल येथे भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने कार चालकाने रस्त्यालगत पार्क केलेली नऊ वाहने उडवली. शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास हा अपघात झाला. रात्रीच्या वेळी रस्त्यावर कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र 9 ते 10 वाहनांचा चक्काचुरा झाला यामध्ये वाहनांचे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले.

3 जून 2024 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भिषण अपघात झाला होता. शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र - कुलगुरु आणि भारती विद्यापीठाचे माजी संचालक डॉ. व्हि. एम. चव्हाण हे जागीच ठार झाले होते. वाहन चालवतानाच हृदयविकाराचा जोरात धक्का बसल्याने ही घटना घडली होती. यामध्ये दोन सख्या भावांसह आणखी एकाचा मृत्यू झाला होता. तर 6 जण जखमी झाले होते. धीरज पाटील यांनाही हृदयविकाराचा धक्का आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हदयविकाराचा धक्का आल्यानंतर त्यांचा मोटारीच्या अॅक्सलेटवर जोरात पाय पडल्यानेच कारने प्रचंड वेग घेतला असावा, अशीही शक्यता व्यक्त होत आहे.

धीरज पाटील यांनी दोनच महिन्यापूर्वी ही इलेक्ट्रिक कार घेतली होती. अपघतावेळी त्यांच्या वाहनाचा वेग प्रचंड होता. धडकेनंतर वाहनाच्या पुढील भागाचा चक्काचुरा झाला होता. तर गाडीतील एअरबॅगही उघडल्या होत्या. तसेच वाहन धडकत असताना अचानक ब्रेक लागल्यामुळे वाहन विरुद्ध दिशेला फिरले. यावेळी चाकाजवळ अक्षरशा ठिणग्या उडाल्या होत्या. याचे सिसीटीव्ही फुटेज सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर अपघातची तीव्रता जाणवत होती.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article