10 कोटी वर्षांपासून जिवंत माशांची प्रजाती
डायनासोर नष्ट झाले तरीही अस्तित्व टिकवून
एलिगेटर गार याला जिवंत जीवाश्म देखील म्हटले जाते, कारण हा 10 कोटी वर्षांपासून जिवंत प्रजाती आहे. याच्या मगरीसारख्या तोंडात टोकदार दातांची ओळ असते, हे दात स्वत:च्या शिकारीला एकाचवेळी चिरून ठेवतात, या प्राचीन माशाला आतापर्यंत कुठलीच नैसर्गिक आपत्ती नष्ट करू शकलेली नाही तसेच त्या काळातील डायनासोरही संपवू शकलेले नाहीत.
सर्वसाधारणपणे हा मासा अमेरिका आणि मेक्सिकोच्या नद्यांमध्ये आढळतो किंवा मेक्सिकोच्या उपसागरात असतो. हा मासा अन्न म्हणून खेकडे, मासे, पक्षी, सस्तन जीव, कासव यासारखे जीव पसंत करतो. याचे नाव अत्यंत लांब असते, शरीरावर कवचसारखे स्केल्स तयार झालेले असतात, हा मासा पाण्याच्या वरच्या पृष्ठभागावर आल्यास त्याला मगर देखील समजण्याची चूक घडू शकते.
याचमुळे याला लोक एलिगेटर गार असे संबोधितात. हा मासा कमाल 8 फूट लांबीचा असू शकतो. तर याचे वजन 136 किलोग्रॅमपर्यंत असू शकते. हा मासा अत्यंत वेगाने वाढणारा आहे. हा स्वत:च्या अंड्यातून बाहेर पडल्याच्या पहिल्या वर्षातच 2 फूट लांबीचा होतो. मग स्वत:च्या पूर्ण जीवनात त्याच्या शरीराची वाढ होत राहते. हा मासा कमाल 100 वर्षांपर्यंत जगू शकतो.
जिवंत जीवाश्म का?
एलिगेटर गार हा कोट्यावधी वर्षांपासून जिवंत असलेल्या प्राचीन जीवांमध्ये सामील आहे. त्याची प्रजाती कुठल्याही बदलाशिवाय तग धरुन आहे. माणसांची प्रजाती माकडांमधून विकसित झाली, परंतु या माशाच्या प्रजातीत कुठलाच बदल झालेला नाही. याचा विकास जवळपास थांबला आहे. 1930 च्या आसपास या माशांनी अमेरिकेत दहशत निर्माण केली होती. तेव्हा टेक्सास गेम फिश कमिशनने या माशांना 200 वोल्टचा विजेचा झटका देत मारण्याचा आदेश दिला होता. परंतु सद्यकाळात हा मासा फ्लोरिडात संरक्षित आहे. टेक्सासमध्ये याच्या शिकारीवर अनेक ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे.