For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दसरोत्सवानिमित्त धावणार विशेष रेल्वे

12:38 PM Oct 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
दसरोत्सवानिमित्त धावणार विशेष रेल्वे
Advertisement

बेंगळूर, म्हैसूर एक्स्प्रेसचा समावेश

Advertisement

बेळगाव : नैर्त्रुत्य रेल्वेने दसरोत्सवानिमित्त स्पेशल रेल्वे सोडल्या आहेत. यशवंतपूर-बेळगाव, बेळगाव-म्हैसूर यासह इतर मार्गावर या एक्स्प्रेस धावणार आहेत. सध्या नवरात्रीनिमित्त रेल्वे प्रवाशांची गर्दी होत असल्याने गर्दीच्या मार्गांवर विशेष रेल्वेसेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. 073606 यशवंतपूर-बेळगाव एक्स्प्रेस 10 रोजी यशवंतपूर येथून निघणार आहे. रात्री 8.55 मिनिटांनी यशवंतपूर येथून निघालेली एक्स्प्रेस दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता बेळगावला पोहोचेल. तर 07307 बेळगाव-म्हैसूर एक्स्प्रेस 11 रोजी सायंकाळी 5.30 वाजता बेळगावमधून निघणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी 6.25 वाजता म्हैसूर येथे पोहोचेल. याबरोबरच इतर मार्गांवरही दसरोत्सवानिमित्त स्पेशल रेल्वे सोडण्यात आल्या आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.