कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नराशिवाय जन्म देणारा साप

06:52 AM May 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आमचे जग अत्यंत विचित्र आहे, या जगात असे अनेक जीव जंतू आहेत, ज्याबद्दल माणसाला फारशी माहिती नसते. अशाच प्राण्यांमध्ये सापाचा समावेश आहे. जगात एक असा साप आहे, जो इतका छोटा आहे की तो पाहून लोक त्याला अन्य प्राणी समजत असतात. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे हा साप जगातील सर्वात छोटा साप असून यात केवळ मादी असतात, म्हणजेच हा साप नराशिवायच पिल्लांना जन्म देत असतो. ब्राह्मिनी ब्लाइंड स्नेक असे याचे नाव आहे. याला जगातील सर्वात छोटा साप मानण्यात येते. या सापाची ओळख पटविण्यासाठी त्याच्या डोक्याकडे पहावे लागते. हा साप अन्य सापांप्रमाणेच जीभ बाहेर काढत असतो, परंतु हा विषारी नसतो.

Advertisement

Advertisement

या सापांकडे डोळे नसतात, तर त्या ठिकाणी अत्यंत छोटे काळे बिंदू असतात, जे त्यांना प्रकाशाचा अनुभव करवितात. याप्रकारे ते मातीच्या वर आहोत का खाली समजून घेतात. हा साप छोटे किडे, मुंग्या आणि वाळवी फस्त करत असतात. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे आतापर्यंत जितके या प्रकारचे साप मिळाले आहेत ते सर्व मादी आहेत. हा साप केवळ मादी असतो आणि हा जगातील एकमात्र एकलिंगी जीव असल्याचे वैज्ञानिकांनी शोधून काढले आहे. हा साप पार्थिनोजेनेसिस नावाच्या प्रक्रियेतून पिल्लांना जन्म देतो. याला वर्जिन बर्थ असेही म्हटले जाते. काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर या सापाचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. यात एक युवक हा साप हातात घेऊन असल्याचे दिसून आले होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article