For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आत्तेभावाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार!

01:15 PM Aug 27, 2024 IST | Abhijeet Khandekar
आत्तेभावाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Accused who raped 91 girls Gajaad
Advertisement

कोयनानगर प्रतिनिधी

आत्तेभावानेच 15 वर्षीय बहिणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कोयना परिसरातील एका गावात घडली. या प्रकरणी बाललैंगिक अत्याचार कायदा (पोक्सो) अंतर्गत कोयना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपअधीक्षक विजय पाटील यांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेत तात्काळ कारवाईसह चौकशीसत्र सुरू केले. दरम्यान, हा प्रकार 4 जून 2024 रोजी घडला असल्याचे फिर्यादीत म्हटले असून यावरही पोलीस तपास करत आहेत.

Advertisement

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गेल्या अनेक वर्षापासून कोयना विभागातील एका गावात ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या पण सध्या दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी गेलेल्या एका 15 वर्ष 5 महिने वयाच्या अल्पवयीन पीडित मुलीवर आत्तेभावाने अत्याचार केला. संबधित मुलगी 4 जून 2024 रोजी आपल्या राहत्या घरात एकटी असताना आत्ते भावाने जबरदस्तीने अत्याचार केला. हा प्रकार घडल्यानंतर संबधित कुटुंब भीतीच्या छायेत होते. दरम्यान, पीडित मुलीच्या नातेवाईकांनी कोयनानगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांची हकीकत ऐकून घेतल्यावर बोंद्री येथील तरुणावर पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला. पाटणचे पोलीस उपअधीक्षक विजय पाटील यांना हा प्रकार समजताच त्यांनी तात्काळ संशयिताला अटक करण्यासाठी स्वत: सापळा रचला. त्याला अटक करून चौकशी सुरू केली. याप्रकरणी पुढील तपास पाटणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे करत आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.