For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजीवर थुंकणाऱ्या विक्रेत्याला रंगेहाथ पकडले

10:40 AM Nov 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
भाजीवर थुंकणाऱ्या विक्रेत्याला रंगेहाथ पकडले
Advertisement

कारवारमधील जनतेमध्ये संतापाची लाट

Advertisement

कारवार : भाजी ठेवण्यासाठी पाणी शिंपडताना थुंकणाऱ्या विव्रेत्याला रविवारी येथे रंगेहाथ पकडण्यात आले. या संतापजनक प्रकारानंतर कारवार नगरसह तालुक्यातील जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे. भाजीविव्रेत्याच्या विरोधात रीतसर दाखल केल्यानंतर कारवार शहर पोलिसांनी भाजीविव्रेत्याला ताब्यात घेतले आहे. भाजीवर थुंकणाऱ्या विक्रेत्याचे नाव अब्दुलहुसेन साब रजाक (रा.हानगल ता. जि. हावेरी) असे आहे. अधिक माहिती अशी की, रविवारी येथे आठवडी बाजार भरत असतो. कारवार तालुक्यासह संपूर्ण कारवार जिल्ह्यात भाजीपाल्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात नाही. त्यामुळे आठवडा बाजारात बेळगाव, धारवाड, गदग, हावेरी आदी जिल्ह्यातून भाजीविक्रेते येथे दाखल होत असतात. अब्दुलहुसेन याने सकाळी पंपरोडवर भाजीपाल्याचे दुकान थाटले होते. अब्दुलहुसेन भाजी ताजी ठेवण्यासाठी कि अन्य कारणासाठी माहिती नाही. भाजीवर पाणी शिंपडत असतानाच थुंकतही असल्याचे एका ग्राहकाला दिसून आले. त्या ग्राहकाने रजाक यांच्या या विकृतीचा व्हिडीओ केला आणि सोशल मिडियावर व्हायरल केला. त्यामुळे दुकानाजवळ नागरिक जमा झाले आणि त्यांनी त्या अतिशय किळसवाण्या कृतीबद्दल जाब विचारला. रजाकला यावेळी चोपही देण्यात आला.

कारवारमधील घटनेने संताप

Advertisement

यावेळी इतर विक्रेत्यांनी जनतेला साथ दिली. त्यानंतर रजाक यांच्याविरोधात रितसर तक्रार देण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी रजाक याला ताब्यात घेतले आहे. आाणि अधिक तपास सुरू आहे. कारवारात अशाप्रकारची घटना प्रत्यक्षात घडल्याने अनेकांना राग अनावर झाला आहे. त्या भाजीविक्रेत्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.