वर्षात केवळ 6 दिवस खुले राहणारे गुप्त बेट
केवळ एकच दुकान, तरीही लोकांचा मोठा ओढा
जगात अनेक अशी बेटं आहेत, जी फारशी प्रसिद्ध नाहीत, तसेच या बेटांवर मोठे किंवा मोठे आकर्षणही नाही. तरीही वर्षातील केवळ 6 दिवस लोकांसाठी खुले असणाऱ्या बेटाचे लोक सध्या कौतुक करत आहेत. इंग्लंडचे हे गुप्त बेट सैन्याच्या कब्जात आहे. यात केवळ एकच दुकान आणि चर्च आहे. तसेच येथे कुठलाही पब नाही. परंतु 150 लोकांच्या या गावात जाण्यासाठी विशेष अर्ज करावा लागतो.
एसेक्सच्या किनाऱ्याच्या दुसऱ्या बाजूला फाउलनेस बेटावर केवळ 150 लोक राहतात. येथे सुमारे 80 घरे असून ती केवळ दोन गावांमध्ये वसलेली आहेत. या बेटातून कधीकाळी तस्कर ये-जा करत होते, कारण याच्या किनाऱ्यांवर कुणीच दिसून येत नव्हते. तसेच या बेटावर जलमार्ग देखील होते.
20 व्या शतकाच्या प्रारंभी हे फाउलनेस बेट ब्रिटनच्या युद्धविभागाला सोपविण्या त आले होते. आता हे बेट सैन्याच्या ताब्यात आहे. या बेटाचा वापर क्षेपणास्त्रs, बॅलेस्टिक टॉरपीडो इत्यादी शस्त्रास्त्रांच्या परीक्षणासाठी केला जातो. ऑफिशियल सीक्रेट अॅक्ट अंतर्गत येथील कार्यांना क्लासिफाइड ठरविण्यात आले आहे. यामुळे तेथील घडामोडींविषयी फारशी माहिती समोर येत नाही.
तरीही ब्रिटनचे लोक सुटी व्यतित करण्यासाठी या बेटावर महिन्याच्या पहिल्या रविवारीच येऊ शकतात. हे बेट केवळ 6 महिन्यांसाठी खुले असते. बेटावर येण्यासाठी पर्यटकांना पूर्ण नोंदणी प्रक्रियेला सामोरे जावे लागते. बेटाच्या हेरिटेज सेंटरच्या वेबसाइटवर पूर्वीच अर्ज करावा लागतो. हे सेंटर 2003 साली एका जुन्या शाळेत सुरु करण्यात आले होते. या सेंटरमध्ये बेटावरील 2000 वर्षे जुना इतिहास दर्शविणारी सामग्री प्रदर्शित करण्यात आली आहे.
लोकांना या बेटावरील प्रत्येक भागात फिरू दिले जात नाही. पूर्वी येथे दोन पब होते, परंतु आता ते 2007 पासून बंद आहेत. येथे केवळ एक चर्च असून तेथे लोकांना जाता येते. याचबरोबर येथे एक दुकान असून ते पोस्ट ऑफिसप्रमाणे देखील काम करते. हिवाळ्यात येथे मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित पक्षी दाखल होत असतात. याचबरोबर येथे देशातील सर्वात धोकादायक फूटपाथ असून त्यावरून केवळ भरती नसतानाच चालता येते.