विहिरीत अडकलेल्या खवले मांजराला वन विभागाकडून जीवदान
लांजा तालुक्यातील कोर्ले येथे एका विहिरीत अडकलेल्या खवले मांजराला जीवदान देण्यात वन विभागाला यश आले. रेस्क्यू ऑपरेशनकरून वन विभागाने खवले मांजराला सुरक्षित विहिरी बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडले.
लांजा तालुक्यातील कोरले येथील शेतकरी सुधाकर गोपाळ कांबळे यांच्या काजू बागेच्या विहिरीत खवले मांजर असल्याचे दुपारी तीन वाजताच्या दरम्यान आढळून आले. सुधाकर कांबळे यांनी लांजा वन विभागाला माहिती दिली. तातडीने लांजा वनाधिकारी दिलीप आरेकर, वनरक्षक श्रावणी पवार, नमिता कांबळे आणि वनमित्र अमित लांजेकर यांनी घटनास्थळी जाऊन विहिरीत पडलेल्या खवले मांजर याला उशिरा सायंकाळी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले.
पशु वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत तपासणी करून सदर खवले मांजराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले वन विभागाचे अधिकारी रत्नागिरीच्या गिरीजा देसाई सहायक वनरक्षक वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा वनपाल दिलीप आरेकर, वनरक्षक श्रावणी पवार, नमिता कांबळे आणि वनमित्र अमित लांजेकर यांनी यशस्वी कामगिरी केली.