For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाताल लोकची सैर करविणारा रोलरकोस्टर

10:08 PM Aug 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
पाताल लोकची सैर करविणारा रोलरकोस्टर
Advertisement

थेट जातो 180 फूट खोल अंधारात

Advertisement

ब्रिटनच्या ऑल्टन टॉवर्समध्ये एक असा रोलरकोस्टर आहे, ज्याला जगातील पहिला वर्टिकल ड्रॉप रोलरकोस्टर म्हटले जात आहे. हा केवळ झोपाळा नसून एक असा अनुभव आहे, जो तुम्हाला खरोखरच ‘पाताल लोक’ची सैर करवितो. या रोलरकोस्टरद्वारे तुम्ही थेट 180 फूट खोल अंधारात पोहोचता. कमकुवत हृदय असलेल्या लोकांसाठी हा राइड वाईट स्वप्नापेक्षा कमी नसेल. कारण हा तुमची हिंमत आणि धैर्याची परीक्षा घेतो. ऑब्लिवियन नावाच्या या रोलरकोस्टरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. परंतु यात बसण्याची हिंमत फारच कमी लोक करतात.

ऑब्लिवियन तुम्हाला भीतीशी थेट सामान करण्याची संधी देते. यात 180 फूटांचा एक विशाल वर्टिकल ड्रॉप असून तो ऑल्टन टॉवर्स थीमपार्कमध्ये सर्वात उंच आहे. या राइडमध्ये अचानक एक थेटा सरळ रेषेत 180 फूट खाली जाण्यास सुरुवात झाल्यावर लोकांचा थरकाप उडतो. ऑल्टन टॉवर्स थीम पार्कमध्ये हा रोलरकोस्टर 1998 मध्ये सुरू झाला होता, याची निर्मिती स्वीस कंपनी बोलिगर अँड मबिलार्डने केली होती. 180 फूटांचा जवळपास वर्टिकल ड्रॉप (87.5 अंश) आणि 109.4 किलोमीटर प्रतितासाच्या वेगासह हा युकेतील चौथ सर्वात वेगवान रोलरकोस्टर आहे. 4.5जी फोर्ससह हा लोकांना एक अशी सैर करवितो, जी कमकुवत हृदय असलेल्यांसाठी नाही.

Advertisement

राइडची सुरुवात 60 फूटांच्या चढाईने होते, जी 45 अंशाच्या कोनावर हळूहळू भीती वाढवत जातहे. हॉरिजॉन्टल चेन मॅकेनिज्म सवारांना 4 सेकंदांपर्यत ड्रॉपच्या काठावर लटकवत ठेवते. मग अचानक 180 फूट खोल अंधाऱ्या भुयारात नेते, ज्याला पाताल लोकप्रमाणे स्वरुप देण्यात आले आहे. राइडमध्ये दोन फोटो पॉइंट्स असून एक ड्रॉपच्या प्रारंभी तर दुसरा हाय-बँक टर्नच्या अखेरीस आहे. हा जगातील तांत्रिकदृष्ट्या सर्वात प्रगत राइड आहे. हा राइड पूर्णपणे सुरक्षित असून सर्वकाही लोकांचा आराम आणि आनंदासाठी डिझाइन करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

जी-फोर्स

जी-फोर्स प्रत्यक्षात गुरुत्वाकर्षण शक्तीचे एक माप आहे.  जेव्हा तुम्ही बसलेले किंवा उभे असता तेव्हा 1जीचा अनुभव करता. परंतु जेव्हा एखादी वस्तू उदाहरणार्थ रोलरकोस्टर वेगाने वेग बदलते किंवा वळते, तेव्हा त्यावर लागणारे बळ जी-फोर्समध्ये मोजले जाते. 4.5जीचा अर्थ त्याक्षणी तुमच्या शरीरावर सामान्य गुरुत्वाकर्षण शक्तीपेक्षा साडेचारपट अधिक शक्ती लागत आहे. याचा अर्थ तुमचे वजन 70 किलोग्रॅम असेल, तर त्याक्षणी तुम्ही 315 किलोग्रॅमचे झाल्याचे वाटू लागेल. हा झटका इतका जबरदस्त असतो की काही क्षणांसाठी रक्तप्रवाह प्रभावित होऊ शकतो आणि तुमच्या डोळ्यांसमोर अंधार दाटून येऊ शकतो.

Advertisement
Tags :

.