महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अणुऊर्जा प्रकल्पामध्ये रोलर कोस्टर

06:22 AM Feb 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जगात असा पार्क अन्य कुठेच आढळणार नाही

Advertisement

जगात मुले आणि कुटुंबांसाटी अनेकदा लोक अजब आणि थक्क करणारे थीम पार्क तयार करत असतात. यातील काही थीम पार्क स्वत:च्या अनोख्या लोकेशनसाठी ओळखले जाते, तर काहींची थीमच अत्यंत विचित्र असते. अनेक थीम पार्क तसे साधारण दिसत असतात. परंतु तेथील काही ऑफर्स अत्यंत आकर्षक असल्याने लोकांचे लक्ष वेधले जात असते. जर्मनीत एक थीमपार्कने काहीसे अधिकच अनोखेपणा दाखवून दिला आहे. हे थीम पार्कच अणुउर्जा प्रकल्पाच्या स्थळी तयार करण्यात आले आहे.

Advertisement

वुंडरलँड कॅलकरमध्ये 40 राइड्स मिळतात, परंतु चर्चेचा विषय हे थीम पार्क  अणुउर्जा प्रकल्पाच्या मधोमध असणे आहे. येथील कुलिंग टॉवर तर एका माउंटेन सीनप्रमाणे चित्रित करण्यात आला आहे. हा कार्टूनप्रमाणे तयार करण्यात आला आहे. तरीही हे मुले आणि कुटुंबांसाठी एक आकर्षक थीम पार्क आहे.

हॉटेल अन् रेस्टॉरंट

अन्य थीम पार्कप्रमाणे येथे मुलांसाठी राइड्स, फेरी व्हील आणि मोठ्या चढाईची भिंत आहे. याचबरोबर येथील रोलर कोस्टरची विशेष चर्चा होते. या ठिकाणी 6 हॉटेल्स आणि एक रेस्टॉरंट देखील असून जे येथे लोकांना वीकेंडवर दीर्घकाळ व्यतित करण्यासाठी आकर्षित करतात.

अणुऊर्जा प्रकल्प

अणुऊर्जा प्रकल्पासारखी अनोखी थीम का अवलंबिण्यात आली असा प्रश्न लोकांना पडत असतो. परंतु हे थीम पार्कच प्रत्यक्षात एका अणुऊर्जा प्रकल्पाच्या स्थळी निर्माण करण्यात आले आहे. पण येथे चिंतेची कुठलीच बाब नाही. हा अणुऊर्जा प्रकल्प पूर्णपणे सुरक्षित आहे, कारण तो कधीच पूर्ण होऊ शकलेला नाही. याच्या निर्मितीदरम्यानच याला विरोध सुरू झाला होता आणि निर्मितीत विलंब  होत गेला. येथील कुलिंग टॉवरवर एक क्लायमिंग वॉल निर्माण करण्यात आली असून ती खासकरून साहसी लोकांसाठी आहे. या थीम पार्कमध्ये लोकांना आकर्षित करण्यासाठी खास ऑफर आहे. येथील तिकिटातच खाद्यपदार्थ आणि ड्रिंक्स सामील आहेत, ज्यात फ्रेंच फ्राइज, आईस्क्रीम आणि सॉफ्ट ड्रिंक्स सामील आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat#international#social media
Next Article