ड्रॉवरमध्ये पडून होता मंगळ ग्रहावरील दगड
93 वर्षांपासून कुणालाच नव्हते माहित
अमेरिकेच्या इंडियानामध्ये प्यूरड्यू युनिव्हर्सिटी असून तेथे 1931 मध्ये एका ड्रॉवरमध्ये काळ्या रंगाचा दगड आढळून आला होता. हा दगड या ड्रॉवरमध्ये कसा आला हे कुणालाच माहित नव्हते. परंतु ड्रॉवरमधून बाहेर काढण्लेल्या या दगडाचा रंग, रुप, आकार सर्वकाही वेगळच होते, याचमुळे त्याबाबत तपासणी सुरू करण्यात आली.
हा दगड दुसऱ्या ग्रहावरून आलेला दगड असल्याचे कळले, परंतु अलिकडेच झालेल्या एका नव्या अध्ययनात लफायते उल्कापिंड या नावाने प्रसिद्ध हा दगड मंगळ ग्रहावरून आल्याचा खुलासा झाला आहे. लाल रंगाच्या मंगळ ग्रहावरून काळ्या रंगाचा दगड कसा आला हा प्रश्न उपस्थित होतो. 2 इंच मोठ्या या दगडाच्या आत असलेल्या वायूंद्वारे हा मंगळ ग्रहावरील दगड असल्याचे कळले आहे.
याचा पुरावा नासाच्या वायकिंग लँडरद्वारे मिळाला आहे. या लँडरने मंगळ ग्रहावर अशाच प्रकारच्या दगडांचे परीक्षण केले होते. या दगडाचेही परीक्षण करण्यात आले असता त्यातील वायूंचे अध्ययन करण्यात आले. हा प्राचीन खनिज आणि तरल पाण्याच्या मिश्रणाने तयार झाला होता असे समोर आले आहे. हे अध्ययन अलिकडेच जियोकेमिकल पर्स्पेटिव्ह लेटर्स नावाच्या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे.
पड्यू युनिव्हर्सिटीच्या अर्थ, एटमॉस्फियरिक आणि प्लॅनेटरी सायन्सच्या डिपार्टमेंटच्या सहाय्यक प्राध्यापिका मरीसा ट्रेम्बले यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. सद्यकाळात मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर पुरेशा प्रमाणात पाणी नाही, परंतु या दगडाच्या माध्यमातून आम्हाला 74.2 कोटी वर्षांपूर्वी मंगळ ग्रहावर पाणी होते असे कळले आहे. प्रत्यक्षात तेथे लाखो वर्षांपूर्वी देखली पर्माफ्रॉस्टमध्ये पाणी होते. परंतु चुंबकीय हालचालींमुळे हे पाणी वितळून गेले. त्याचे बाष्पीकरण झाले.
मुलानजीक कोसळला होता दगड
हा दगड पृथ्वीवर कधी आला याची कुठलीच ठोस माहिती नाही, परंतु 1919 मध्ये काही मुले फिशिंग ट्रिपवर गेले असता एका मुलानजीक हा उल्कापिंड येऊन कोसळला होता. हा दगड थंड झाल्यावर मुलाने तो उचलला होता असे इंडियानाच्या आसपासच्या लोकांचे सांगणे आहे. हा दगड मंगळ ग्रहावरून 1.10 कोटी वर्षांपूर्वी एखाद्या मोठ्या दगडाला धडकल्याने वेगळा झाला होता.