कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

केवळ 2 तास दिसणारा रस्ता

06:19 AM Apr 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मग होतो गायब

Advertisement

जगारत मार्गच नसतील तर लोक प्रवास कसा करणार असा विचार करून बघा. पूर्वीच्या काळात रस्ते नसायचे, परंतु पायवाटा असायच्या. परंतु आजच्या काळात याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. परंतु जगात एक असा रस्ता आहे, जो केवळ दोन तासांसाठी खुलतो आणि त्यानंतर तो गायब होत असतो. सर्वसामान्य लोकांसाठी हे एक रहस्य ठरू शकते, परंतु जेथे हा रस्ता आहे तेथील लोकांसाठी ही सामान्य बाब आहे.

Advertisement

युरोपीय देश फ्रान्समध्ये एक असा रस्ता आहे, ज्याचा वापर तेथील लोक दररोज करतात, परंतु केवळ दोन तासांसाठीच या रस्त्यावरून जाता येते. दोन तासानंतर हा रस्ता शोधणे देखील अवघड ठरत असते.  हा रस्ता फ्रान्सच्या अटलांटिक किनाऱ्यावर नोइरमौटीयर आयलँडला मुख्य भूमीशी जोडण्याचे काम करतो. याला पॅसेज टू गोइस या नावाने ओळखले जाते. फ्रेंच भाषेत गोइसचा अर्थ बूट ओले करत रस्ता ओलांडणे असा आहे.

कसा तयार झाला रस्ता

पॅसेज टू गोइसची लांबी 4.5 किलोमीटर आहे. हा रस्ता सर्वप्रथम फ्रान्सच्या नकाशावर 1701 मध्ये दिसून आला होता. पूर्वीच्या काळात या रस्त्याला पार करणे धोकादायक मानले जायचे, कारण तेव्हा हा रस्ता केवळ दोन तासांसाठी दिसायचा आणि लोकांना याविषयी कमी माहिती होती. मग भरतीमुळे समुद्राची पातळी वाढल्यावर हा रस्ता पाण्यात बुडून जातो. पूर्वीच्या काळात बेटापर्यंत जाण्यासाठी नौकांचा वापर व्हायचा. परंतु हळूहळू येथील पाण्यात गाळ जमा होत गेल्याने हा एक रस्ता तयार झाला आहे.

केवळ 2 तास उपलब्ध

हा रस्ता पाण्यात बुडत असतो, तेव्हा 13 फूट खाली जातो आणि याला दुर्घटनांचा रस्ता म्हटले जाते. समुद्राच्या मधोमध असलेला हा रस्ता पाहण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येत पर्यटक दाखल होत असतात. त्यांच्यासाठी हा रस्ता पाहणे कुठल्याही रोमांचापेक्षा कमी नाही. पर्यटक या रस्त्यावर वाहन चालवून साहसी पर्यटनाचा आनंद घेत असतात.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article