10 देशांमधून वाहणारी नदी
जगातील सर्वाधिक नद्या या बांगलादेशात वाहतात, या नद्यांची संख्या सुमारे 700 इतकी आहे. परंतु एक नदी एक किंवा दोन नव्हे तर तब्बल 10 देशांमधून वाहते. डेब्यून ही नदी मध्य युरोपातील सर्वात लांब नंदी असून ती 10 देशांच्या काठांना समृद्ध करते.
डेन्यूब नदीचा उगम जर्मनीतील ब्लॅक फॉरेस्टच्या पर्वतांमध्sय स्थित दोनउएशिंगन नजीक होतो आणि दक्षिणपूर्वच्या दिशेने वाहत ही नदी रोमानियाच्या माध्यमातून काळ्या समुद्रात सामावते. ही नदी युरोपमधील दुसरी सर्वात लांब नदी असून याची एकूण लांबी सुमारे 2850 किलोमीटर इतकी आहे.
ही नदी जर्मनी, ऑस्ट्रिया, स्लोवाकिया, हंगेरी, क्रोएशिया, सर्बिया, बुल्गारिया, मोल्दोवा, युक्रेन आणि रोमानियामध्ये वाहते. डेन्यूब नदी युरोपमधील एक महत्त्वाचा जलमार्ग आहे. या नदीच्या काठावर अनेक शहरे वसलेली आहेत आणि याचमुळे ही नदी व्यापारासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
डेन्यूब नदीवर अनेक धरणे तयार करण्यात आली असून त्यांचा वापर जलविद्युत निर्मितीसाठी केला जातो. या नदीत अनेक प्रकारचे मासे आणि इतर जलचर आढळून येतात. हे क्षेत्र जैवविविधतेसाठी देखील ओळखले जाते. डेन्यूब नदी युरोपीय संस्कृती आणि इतिहासाचा एक महत्त्वपूर्ण हिस्सा आहे. अनेक संस्कृती या नदीच्या काठावर बहरल्या आहेत. परंतु हवामान बदलामुळे डेन्यूब नदीच्या पातळीत परिवर्तन होत आहे. याचा प्रभाव नदीच्या जलव्यवस्थेवर पडत आहे.