For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

होकाटो सेमाला दीड कोटी रुपयांचे बक्षीस

06:55 AM Sep 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
होकाटो सेमाला दीड कोटी रुपयांचे बक्षीस
Advertisement

वृत्तसंस्था/ कोहिमा (नागालँड)

Advertisement

सध्या पॅरिसमध्ये सुरु असलेल्या 2024 च्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात भारताला कांस्यपदक मिळवून देणारा नागालँडचा अॅथलिट होकाटो सेमाला नागालँड शासनातर्फे 1.5 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदक विजेत्या होकाटो सेमाचे खास अभिनंदन केले आहे.

पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत होकाटो सेमाने पुरुषांच्या एफ-57 गोळाफेक प्रकारात 14.65 मी. ची नोंद करत कांस्यपदक पटकाविले. या क्रीडा प्रकारात इराणच्या खोसरेव्हीने 15.96 मी. चे अंतर नोंदवित सुवर्णपदक तर ब्राझीलच्या सँटोसने 15.06 मी. चे अंतर नोंदवित रौप्यपदक जिंकले.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होकाटो सेमाचे खास अभिनंदन केले असून त्याच्या इच्छाशक्ती आणि एकाग्रतेचे कौतुक केले आहे. नागालँड राज्यातर्फे होकाटो सेमा  ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक मिळविणारा अॅथलिट आहे. या स्पर्धेत भारताची कामगिरी टोकियो पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेच्या तुलनेत अधिक सरस झाली आहे. आतापर्यंत भारताने 6 सुवर्ण, 9 रौप्य आणि 12 कांस्य अशी एकूण 27 पदकांची कमाई केली आहे.

Advertisement
Tags :

.