मानवी थडग्यांवर असलेले रेस्टॉरंट
मॅकडोनाल्ड्स अनेक आउटलेट्स अत्यंत विचित्र आहेत. काही अजब प्रकारे निर्माण करण्यात आले आहेत, तर काही अजब ठिकाणी आहेत. परंतु एक जगातील सर्वात भीतीदायक रेस्टॉरंट आहे. येथे खाणारे लोक स्वत:च्या बिग मॅकसोबत बसून मानवी सांगाड्यांच्या थडग्यांवर वर बसून खाण्याचा आनंद घेतात. रेस्टॉरंटच्या काचयुक्त पारदर्शक जागेच्या खाली जुना रस्ता असून तेथे हे सांगाडे मिळाले होते. या रस्त्याला आता संग्रहालयाचे स्वरुप देण्यात आले आहेत.
कामगारांनी 2014 मध्ये इटलीच्या फ्रैटोची येथे फास्ट फूड आउटलेट तयार करताना 2 हजार वर्षे जुन्या रस्त्याचा शोध लावण्यात आल्यावर याची निर्मिती झाली. पुरातत्वतज्ञांनी रोमच्या बाहेरील भागात या ठिकाणच्या उत्खननात मदत केली आणि यात तीन मृतदेह आढळून आले. हे मृतदेह तिसऱ्या शतकात येथे दफन करण्यात आले होते असे मानले जाते.
पक्का रस्ता प्राचीन रोममधील सर्वात गर्दी असलेल्या रस्त्यांपैकी एक एपियन वेशी जोडलेला असल्याचे मानले जाते. रोमन साम्राज्यादरम्यान हा रस्ता बंद करण्यात आला होता, ज्यानंतर तो दफनभूमीच्या स्वरुपात वापरण्यात आला असावा असे मानले जात आहे.
आता रेस्टॉरंटमध्ये ग्राहक मृतांच्या थडग्यांवर उभारण्यात आलेल्या रेस्टॉरंटमध्ये भोजन करू शकतात आणि प्राचीन रस्ता तसेच सांगाड्यांना एका पारदर्शक काचेतून पाहू शकतात. तसेच ग्राहकांना स्वत:ही तेथे जाता येऊ शकते. या रेस्टॉरंटचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्याला 1 कोटी 34 लाख ह्यूज मिळाल्या आहेत. हजारो लोकांनी यावर कॉमेंट केली आहे.