For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

वेंगुर्ला मच्छिमार सह. संस्थेच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलचा दणदणीत विजय

10:55 AM Jan 12, 2024 IST | अनुजा कुडतरकर
वेंगुर्ला मच्छिमार सह  संस्थेच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलचा दणदणीत विजय

प्रतिस्पर्धी पॅनेल मधील एकच उमेदवार विजयी

Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-
येथील श्री वेंगुर्ला मच्छिमार सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांनी बहुमताधिक्य घेत संस्थेवर आपली सत्ता प्रस्थापित केली. सलग चार वर्षे परिवर्तन पॅनेलने या संस्थेवर आपले वर्चस्व प्रस्थापित करून आपल्या कामाचा ठसा उमटविल्याचे या निकालातून दाखवून दिले आहे.
धी वेंगुर्ला मच्छिमार सहकारी संस्थेची सन २०२४-२५ ते २०२८-२९ या पाच वर्षाच्या कालावधीसाठी संस्थेच्या १५ सदस्यांसाठीची निवडणुक रविवार दि. ७ जानेवारी रोजी मतदानाने संपन्न झाली. या निवडणुकित एकूण मतदान ८६७ झाले होते. त्यापैकी ८०१ मते वैद्य ठरलीत तर ६६ मते अवैध ठरली. या निवडणुकीत परीवर्तन पॅनेल व मानसीश्वर पॅनेल आणि अपक्ष उमेदवारांनी सहभाग घेतला होता. यावेळी झालेल्या मत मोजणीत क्रियाशील सर्वसाधारण सभासद मतदार संघातून वसंत महादेव तांडेल (३४७), प्रकाश दत्ताराम मोठे (३४४), निलेश काशिनाथ खडपकर (३४२), आनंद रामचंद्र वेंगुर्लेकर (३४२), सागर मोहन म्हाकले (३४०), विनायक भरत केळूसकर (३३३), मनोहर रामचंद्र तांडेल (३२६), मनोज चंद्रकांत कुबल (३२४), तर मानसीश्वर पॅनेलमधील आगोस्तीन सिमाव फर्नांडीस (२७९), भुषण भगवान कोचरेकर (२४४), राजेंद्र दत्ताराम कुबल (१७५), राजाराम पुरूषोत्तम मालवणकर (२५७), भुषण अजित नाईक (२६८), निकेश नितीन नांदोस्कर (२५५), सुरेश मनोहर तांडेल (२४०), चंद्रशेखर रामकृष्ण तोरस्कर (२३५), चंद्रशेखर संभाजी येरागी (२५४), व अपक्ष उमेदवार राजेंद्र दत्ताराम कुबल (१७५) यांना अशी मते मिळाली. महिला प्रतिनीधी मतदार संघातून परीवर्तन पॅनेलची आयेशा गुरूदास हुले (४१५) व सिमा सुभाष पराडकर हि मानसीश्वर पॅनेलची एकमेव उमेदवार (३६३) विजयी झाली. मात्र या मतदार संघातील मानसीश्वर पॅनेलच्या उमेदवार सोनिया अमोल वरसकर (२९०) व अपक्ष उमेदवार संचिता शरद गिरप (२०१) यांना अशी मते मिळून पराभवास मोरे जावे लागले. इतर मागास प्रवर्ग मतदार संघातून परिवर्तन पॅनलचे अनंत वासुदेव केळूसकर (४५८) हे विजयी झाली तर प्रतिस्पर्धी मानसीश्वर पॅनेलचे रामचंद्र कमलाकांत भोगवेकर यांना (३१८) मते मिळाली. आणि भटक्या जाती- जमाती विशेष प्रवर्ग मतदार संघातून महेश रामचंद्र मोरगे (४७९) हे परीवर्तन पॅनेलचे उमेदवार विजयी झाले तर मानसीश्वर पॅनेलचे उमेदवार योगेश रामचंद्र शेळके यांना ३०६ मते मिळाली. दरम्यान, या निवडणुकित गेली ५ वर्षे चेअरमन पद भुषविलेले राजेंद्र दत्ताराम कुबल हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक रिंगणात होते. मात्र त्यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.या निवडणुकीसाठी निवडणुक अधिकारी म्हणून वेंगुर्ले सहकार खात्याचे अधिकारी प्रशांत साळगांवकर यांनी काम पाहिले. निवडणुकीचा निर्णय जाहीर केल्यानंतर सर्व विजयी उमेदवारांचे त्यांनी अभिनंदन केले.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.