महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय महिलांचा दणदणीत विजय

06:50 AM Oct 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लंकेवर 82 धावांनी मात, हरमनप्रीत सामनावीर, रनरेट सुधारल्याने दुसऱ्या स्थानी झेप

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

Advertisement

स्मृती मानधना व कर्णधार आणि सामनावीरची मानकरी हरमनप्रीत कौर यांनी सूर गवसल्यानंतर नोंदवलेली जलद अर्धशतके आणि अरुंधती रेड्डी व आशा शोभना यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या बळावर भारतीय महिला संघाने महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत महत्त्वाच्या सामन्यात लंकेचा 82 धावांनी धुव्वा उडवित उपांत्य फेरी गाठण्याच्या दिशेने आगेकूच केली. भारताने जोरदार फटकेबाजी करीत नेट रनरेटमध्येही सुधारणा केल्यामुळे गुणतक्त्यात आता भारतीय महिलांना दुसरे स्थान मिळाले आहे.

सलामीवीर शेफाली वर्मा (40 चेंडूत 43) व स्मृती (38 चेंडूत 50) यांनी प्रारंभापासूनच्या आक्रमक धोरण अवलंबले दोघींनी 98 धावांची सलामी देत विजयाचा पाया रचला. हरमनप्रीतने नंतर डेथ ओव्हर्समध्ये फटकेबाजी करीत संघाला पावणेदोनशेच्या जवळ मजल मारून दिली. तिने 27 चेंडूत 8 चौकार, 1 षटकांसह नाबाद 52 धावा फटकावल्या. भारताने निर्धारित 20 षटकांत 3 बाद 172 अशी भक्कम धावसंख्या उभारली. या स्पर्धेतील ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. आशिया चषकाच्या अंतिम फेरीत लंकेने भारताला हरवून जेतेपद पटकावले होते. पण या सामन्यात लंका संघ पूर्णत: निष्प्रभ ठरला आणि त्यांचा डाव 19.5 षटकांत केवळ 90 धावांत आटोपला.

लंकेचा हा तीन सामन्यातील तिसरा पराभव आहे तर भारताचा दुसरा विजय असून उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवामुळे भारताच्या रनरेटवर परिणाम झाला होता, त्यामुळे त्यांना मोठ्या विजयाची गरज होती आणि त्यात त्या यशस्वीही ठरल्या. या स्पर्धेच्या इतिहासातील भारताचा हा सर्वात मोठा विजय असून रनरेटही निगेटिव्ह वरून पॉझिटिव्हवर आली आहे. भारताचा शेवटचा सामना बलाढ्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारताचा आता 0.560 रनरेट झाला असून दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तान महिला 0.555 तर न्यूझीलंड -0.050 रनरेटसह अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानावर आहेत.

संक्षिप्त धावफलक : भारत महिला संघ 20 षटकांत 3 बाद 172 : शेफाली वर्मा 40 चेंडूत 43, स्मृती मानधना 38 चेंडूत 50, हरमनप्रीत 27 चेंडूत नाबाद 52, जेमिमा रॉड्रिग्स 10 चेंडूत 16. चमारी अटापटू 1-34, अमा कांचना 1-29.

लंका महिला संघ : 19.5 षटकांत सर्व बाद 90 : कविशा दिलहारी 22 चेंडूत 21, अनुष्का संजीवनी 22 चेंडूत 20, अमा कांचना 22 चेंडूत 19. रेणुका सिंग 2-16, अरुंधती रेड्डी 3-19, आशा शोभना 3-19.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article