पांडा सारखा दिसणारा लाल तोंडाचा प्राणी
बदकासारखा काढतो आवाज, रात्री चमकतो याचा चेहरा
जगात अनोख्या प्राण्यांची कमतरता नाही. काही प्राण्यांना पाहून ते अनेक प्राण्यांचे मिश्रण असल्याचे वाटते. लाल पांडा हा अशाच प्राण्यांपैकी एक आहे, ज्याची वैशिष्ट्योच त्याला इतरांपासून वेगळी करतात. त्याच्या शरीराचा आकारच नव्हे तर अन्य कार्ये देखील अन्य प्राण्यांसारगी आहेत. त्याला बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण प्रजाती मानण्यात येते.
लाल पांडा चेहऱ्याने पांडासारखाच दिसतो. तर विशाल पांडाच्या प्रजातीशी त्यचे खास देणेघेणे नाही. रॅकूनसारख्या प्राण्यांशी त्यांची अधिक जवळीक आहे. अलिकडेच झालेल्या आनुवांशिक संशोधनाने त्यांना मस्टेलिडे परिवाराशी जोडले आहे, ज्यात वीजल, वूल्वरिन यासारख्या प्राण्यांचा समावेश आहे.
लाल पांडाला ‘लाल भालू-बिल्ली’ असेही संबोधिले जातो. हे नाव त्यांच्या पिल्लांना (अस्वलाच्या पिल्लांप्रमाणे) दिले जाते, जी सर्वसाधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत जंगलात जन्माला येतात, तर पिल्लं उपाशी असताना स्वत:च्या आईचे लक्ष वेधून घेण्यासाठी मोठ्या आवाजात शिटीसारखा आवाज काढतात. लाल पांडाची आई स्वत:च्या पिल्लांना स्वच्छ टेवण्यासाठी मांजराप्रमाणे स्वत:च्या जीभेचा वापर करते आणि त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी स्वत:च्या पिल्लांना तोंडात पकडून, मानेला धरून उचलते.
लाल पांडा स्वत:च्या हाताचा एक हिस्सा अंगठ्याप्रमाणे वापरतो. हा छद्म अंगठा प्रत्यक्षात एक वाढलेले मनगटाचे हाड असते, ज्याचा वापर ते झाडांवर चढण्यासाठी आणि बांबूची पाने आणि झाडांच्या फांद्यांना पकडण्यासाठी करतात, विशाल पांडाकडेही छद्म अंगठा असतो परंतु दोघांमध्ये हे वेगवेगळ्या कारणांमुळे विकसित झाले आहे.
लाल पांडा दिवसभरात 17 तासांपर्यंत झोपलेला असतो, त्यांना रात्री आणि संध्याकाळी अधिक सक्रीय पाहिले जाते. ते झाडांच्या फांद्या किंवा झाडांवरील बिळांमध्ये आराम करणे पसंत करतात. त्यांचे शेपूट 12 ते 20 इंच लांब असू शकते. त्यांच्या शेपटाची लांबी जवळपास त्यांच्या शरीराइतकी आते. झाडाच्या टोकावर चालताना शेपटामुळे त्यांना संतुलन राखता येते. ते थंड पर्वतीय ठिकाणी या शेपटाचा वापर ब्लँकेटच्या स्वरुपातही करतात.
लाल पांडा सर्वसाधारणपणे शांत प्राणी मानला जातो, तरीही ते अनेक प्रकारचे आवाज काढतात, ज्यात चित्कार, ओरडणे, घुरघुरणे, फुसफुसणे देखील सामील आहे. सर्वात खास म्हणजे ते बदकांप्रमाणे देखील आवाज काढत असतात. त्यांना उकसविले तर ते स्वत:च्या मागील पायांवर उभे राहून मोठे दिसण्याचा प्रयत्न करतात.
लाल पांडाच्या शरीरावरील लाल रंगाचे खास महत्त्व आहे. ते स्वत:च्या जंगलाच्या आवासातील लाल काई, पांढरा लाइकेन आणि पिवळ्या-नारिंगी लाल पानांसोबत सहजपणे मिसळून जातात आणि त्यांच्या काळ्या रंगाच्या पोटामुळे ते खालून दिसत नाहीत. लाल पांडाच्या चेहऱ्यावरील पांढरा रंग जवळपास चमकणारा असतो आणि हा काळाखात पिल्लांना मार्गदर्शन करू शकतो.