For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

75 वर्षे जुन्या पत्रामुळे मिळाला दुर्लभ खजिना

06:17 AM Aug 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
75 वर्षे जुन्या पत्रामुळे मिळाला दुर्लभ खजिना
Advertisement

कधीकधी काही कारणांमुळे जुन्या रहस्याचा खुलासा होत असतो. आता अशीच एक घटना घडली आहे. जर्मनीच्या बवेरियामध्ये शासकीय दस्तऐवजांच्या डिजिटलीकरण प्रक्रियेदरम्यान एक 75 वर्षे जुने पत्र मिळाले. 1949 मध्ये हे पत्र लिहिण्यात आले हेते, ज्यात एका बुटाच्या डब्याचा उल्लेख करण्यात आला होता. यात पिवळ्या रंगाचे चमकदार तुकडे ठेवण्यात आले होते. या पत्राने वैज्ञानिकांना हम्बोल्टाइनपर्यंत पोहोचविले. हे एक अत्यंत दुर्लभ खनिज असून जगात आतापर्यंत केवळ 30 ठिकाणी उपलब्ध आहे.

Advertisement

हम्बोल्टाइन एक ऑर्गेनिक खनिज असुन त्यात कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यासारखे घटक धातूसोबत क्रिस्टल संरचनेत बांधलेले असतात. याच्या रासायनिक संरचनेत आयर्न आणि ऑक्सलेट असते. हे एका पिवळ्या रंगाचे नरम, रेजिनसारखा चमक असणारे खनिज ठरते. आयर्नयुक्त खडकांचा काही खास अॅसिडिक वातावरणात आर्द्र स्थितींमध्ये संपर्क झाल्यावर नैसर्गिक स्वरुपात हे खनिज तयार होते. याच्या रचनेला एक भूवैज्ञानिक चमत्कार मानले जाते.

या शोधाचे प्रमुख बवेरिया स्टेट ऑफि फॉर द एन्व्हायरनमेंटचे वैज्ञानिक रोलँड आइशहॉर्न आहेत. त्यांच्या टीमने डब्यात ठेवलेल्या पिवळ्या तुकड्यांची पुष्टी केली असता हे हम्बोल्टाइन असल्याचे स्पष्ट झाले. या शोधामुळे जर्मनीत या दुर्लभ खनिजाचा साठा एका क्षणात दुप्पट झाला. यंदा मिळालेले हम्बोल्टाइनचे तुकडे हेल्जलनट इतके मोठे आहेत.

Advertisement

या शोधामुळे भूगोलासोबत तांत्रिक जगतातही रुची वाढली आहे. हम्बोल्टाइनच्या इलेक्ट्रॉन शटलिंग क्षमतेमुळे भविष्यातील ग्रीन टेक्नॉलॉजी, खासकरून हाय-कॅपेसिटी लिथियम-आयर्न बॅटरी कॅथोडसाठी उपयुक्त ठरू शकते.

Advertisement
Tags :

.