महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

छत्तीसगडमधील समृद्ध, आदर्श गाव ... पतोरा !

11:27 AM Jan 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विजय मळीक /पतोरा, छत्तीसगड

Advertisement

छत्तीसगड राज्यातील अनेक गावांमध्ये तलावांची निर्मिती करण्यात आली असून त्यातून गावातील शेतीला पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यासाठी तांदुली हे धरण बांधण्यात आले असून त्या धरणातून तलावांना पाणी देण्यात येते. त्यामुळे हे तलाव कधीच आटत नाहीत. प्रत्येक गावात एक-दोन तरी तलाव असल्याचे दिसून आले. पतोरा गावातही तलाव असल्याने हे गाव समृद्ध बनले आहे. केंद्र सरकारच्या ‘अमृत सरोवर’ या योजनेतून तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे गावात पाणी टंचाई होत नाही. शिवाय शेतीला आरामत पाणी मिळते. छत्तीसगड सरकारने त्या योजनेचा पुरेपूर लाभ उठवला असून गावोगावी तलाव बांधले आहेत. शौचालये व इतर कामांसाठी त्यातील पाणी वापरले जाते. तशी सार्वजनिक शौचालये देखील ग्रामीण भागात उभारण्यात आली असून त्याकरीता केंद्रीय योजनांचा वापर करण्यात आला आहे.
Advertisement

गोव्याने आदर्श घेण्यासारखा

गोव्यातील ग्रामपंचायती आणि स्वयंसेवी गट महिला मंडळे यांनी दखल घ्यावी, अशी कामगिरी छत्तीसगड राज्यातील दुर्ग जिह्यात असलेल्या पतोरा व मंचादोर या दोन पंचायती तसेच तेथील महिला स्वयंसेवी गटांनी कऊन दाखवली आहे. त्यांचा आदर्श गोवा राज्यातील पंचायती गटांनी घेण्यासारखा आहे. विशेष म्हणजे पतोरा गावंची सरपंच एक महिला आहे.

कचऱ्यातून होते कमाई

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन, मनरेगा या योजना व मोहीमेअंतर्गत पतोरा गावात स्थानिक स्वयंसेवी महिला गटातर्फे स्वच्छता राबवली जाते. गावातील सर्व प्रकारचा कचरा गोळा कऊन त्यातील काही टिकावू वस्तू- साहित्य त्या महिला विकतात आणि त्यातून कमाई करतात. पतोरा पंचायतीतर्फे त्यांना प्रति महिना ऊ. 5000 देतात शिवाय विक्रीतून कमाई होते ती वेगळीच! त्यामुळे गावात स्वच्छता होते व महिलांना रोजगार मिळतो. केंद्र सरकारची योजनेतून त्यांना हा उद्योग सुऊ कऊन देण्यात आला आहे. मोदी सरकारच्या योजना मोहीमेतून पतोरा पंचायतीने स्फूर्ती घेवून सरपंच अंजिता साहू यांनी हा करीश्मा साकारला आहे.

पंचायत तयार करते खते

पतोरा गावात गोबर गॅस, सांडपाणी निचरा प्रकल्प उभारण्यात आले असून त्यातून शेती, उद्याने यांना पाणी दिले जाते. तसेच अंगणवाडी इतर कामांसाठी इंधन म्हणून गोबर गॅसचा वापर करण्यात येतो. कचऱ्यापासून तसेच शेणापासून खते तयार कऊन पंचायतीच्या माध्यमातून त्याची विक्री होते.

पंचायतीत 50 टक्के महिला

पंचायतीमध्ये महिलांना 50 टक्के प्रतिनिधित्व आहे. पतोरा पंचायतीत 20 सदस्य असून त्यातील 10 महिला असल्याची माहिती श्रीमती साहू यांनी दिली.

मोदी सरकारकडून मोठी मदत

कचरा प्रक्रीयेसाठी पंचायतीला केंद्रातील मोदी सरकारच्या विविध योजनांतून यंत्रे, वाहने देण्यात आली असून त्याचा पुरेपूर फायदा पतोरा पंचायतीने उठवला आहे. मचांदोर गावात तर कुक्कुटपालन-बकरी-गाय पालन हे उद्योग केंद्र सरकारी योजनेतून सुऊ करण्यात आले असून मासळी पैदास करण्यासाठी पाण्याचे 6 खुले टँक उभारण्यात आले आहेत. ग्रामीण विकास योजनेतून हे सर्व साध्य करण्यात आले असून मोदी सरकारच्या अर्थसहाय्यातून हे शक्य झाल्याचे तेथील ग्रामविकास अधिकारी स्वप्नील ध्रुव यांनी सांगितेले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article