वाळवंटात हजारो वर्षे जगणारे रोप
वेलविचिया नावाचे एक असाधारण रोप असून ते वाळवंटासारख्या प्रतिकूल स्थितीही हजारो वर्षांपर्यंत तग धरून राहते. या रोपाच्या या अदभूत शक्ती आणि जीवनाच्या रहस्याला जाणून घेण्यासठी वैज्ञानिक संशोधन करत आहेत. वेलविचिया नाव ऑस्ट्रियन वनस्पतीशास्त्रज्ञ फ्रेडरिक वेलविच यांच्या नावावर पडले आहे. वेलविच यांनी 1859 मध्ये अंगोला येथे या रोपाचा शोध लावला होता. आफ्रिकन भाषेत याला ‘ट्वीब्लाअरकन्नीडूड’ म्हटले जाते. याचा अर्थ ‘दोन पाने जी मरत नाहीत’ असा होतो. हे नाव या रोपासाठी अत्यंत अचूक आहे, कारण हे स्वत:च्या आयुष्यात केवळ दोन पानंच उगवते आणि हजारो वर्षांपर्यंत सर्वात जुन्या वाळवंटात जिवंत राहते.
नामीब वाळवंटाच्या काही
हिस्स्यांमध्ये वर्षाकाठी 2 इंचापेक्षाही कमी पाऊस पडतो. तरीही वेलविचिया रोप हजारो वर्षांपर्यंत जगते. वेलविचियाच्या अवघड स्थितीत टिकून राहण्याच्या क्षमतेने वैज्ञानिकांना चकित केले आहे. या रोपाचे काही नमुने 3 हजार वर्षांपूर्वीचे असून ते लोहयुगाच्या प्रारंभातील आहेत. बहुतांश रोप 1 हजार वर्षांपेक्षा अधिक काळ जगतात. अध्ययनात वेलविचियाच्या जीनोमचे विश्लेषण करण्यात आले. यात रोपाने प्रतिकूल स्थितीनुसार स्वत:त बदल केल्याचे आणि याच्या जीनोममध्ये मोठे बदल झाल्याचे आढळून आले.