स्पर्श होताच रागावणारे रोप
बिजांचा करू लागतो मारा
तुम्ही माणसांना लढता-भांडताना परस्परांना कधी हातांनी तर कधी अस्त्राने मारहाण करताना पाहिले असेल. स्वत:च्या शत्रूला चोख प्रत्युत्तर देण्याची क्षमता काही रोपांमध्ये देखील आहे. एक असेच रोप सूड उगविण्यात तरबेज आहे.
तुम्ही माणसांना रागाच्या भरात सूड उगविताना पाहिले असेल. परंतु एक रोप कुणाचा स्पर्श होताच जोरदार स्वत:च्या बिजांना डागण्यास प्रारंभ करते. वुड सोरेल प्लांटचे वैशिष्ट्या म्हणजे ते स्वत:ला स्पर्श करणाऱ्या जीवाला चांगलीच अद्दल घडविते.
वुड सोरेल प्लांट नावाचे हे रोप कमाल आहे. या रोपाला स्वत:ला कुणी स्पर्श करणे अजिबात आवडत नाही. ही लाजरीप्रमाणे स्वत:ला आपुंचित करून घेत नाही. तर स्पर्श करणाऱ्यालाच धडा शिकविते. सोशल मीडियावर या रोपाचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
वुड सोरेल प्लांट ब्राझील, मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेत आढळून येते. हे रोप स्वत:च्या संग्रहित तणाव ऊर्जेमुळे बिजांना 4 मीटर अंतरापर्यंत अत्यंत वेगाने फेकू शकते. जो रोपांना ट्रिगर करतो, त्याच्याच दिशेने हे रोप बिजांचा मारा करत असते. परंतु हे दृश्य पाहण्याजोगे असते.