For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

100 वर्षांपासून मानवी अस्तित्वाला मुकलेले ठिकाण

07:00 AM Aug 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
100 वर्षांपासून मानवी अस्तित्वाला मुकलेले ठिकाण
Advertisement

कधीकाळी होते नागरी वस्तीने युक्त पृथ्वीवर अशी अनेक ठिकाणे आहेत जी अत्यंत निर्जन आहेत. तर काही ठिकाणे अत्यंत रहस्यमय आहेत. अशा ठिकाणांशी निगडित अनेक भीतीदायक कहाण्या प्रचलित असल्याने लोक तेथे जाणे टाळतात. अशाच एका ठिकाणी मागील 100 वर्षांपासून कुणीच गेलेला नाही आणि ते पूर्णपणे निर्जन आहे. हे ठिकाण इतके निर्जन आहे की तेथे मानवी सावली देखील आजवर पडलेली नाही. परंतु नेहमीच तेथे अशी स्थिती नव्हती. 100 वर्षांपूर्वी हे ठिकाण मानवांनी बागडलेले होते. परंतु एका घटनेनंतर सर्वकाही बदलून गेले आणि आता तेथे कुणीच जात नाही. एवढेच नाही तर तेथे प्राण्यांनाही जाण्यास बंदी आहे.

Advertisement

हे धोकादायक ठिकाण फ्रान्सच्या उत्तरपूर्व भागात आहे. येथे लोकांनी न जाण्यामागे एक कारण असून ते जाणून घेतल्यावर तुम्ही अवाक् व्हाल. या रहस्यमय ठिकाणाचे नाव ‘जोन रोग’ आहे. येथे ठिकठिकाणी ‘डेंजर झोन’चे बोर्ड लागलेले आहेत. जर कुणी या भागात चुकून आला तर त्याने त्यापुढे जाऊ नये याकरता सतर्क करण्याच्या उद्देशाने हे बोर्ड लावण्यात आले आहेत.

या ठिकाणाला रेड झोन या नावानेही ओळखले जाते. पहिल्या महायुद्धापूर्वी या भागात 9 गावे होती, जेथे लोक शेती करून स्वत:चा उदरनिर्वाह करत होते. परंतु महायुद्धाच्या काळात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॉम्बवर्षाव झाल्याने हा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आणि अनेक लोक मारले गेले. यानंतर हे ठिकाण राहण्यायोग्य राहिले नाही. या पूर्ण भागात मोठ्या प्रमाणात केमिकलयुक्त युद्धसामग्री फैलावलेली असल्याने येथील जमीन विषारी ठरली आहे. तसेच येथील पाणीही जीवघेणे झाले आहे. या हा भाग अत्यंत मोठा असल्याने येथील जमीन आणि पाण्याला रसायनमुक्त करणे देखील शक्य नव्हते. अशा स्थितीत फ्रान्स सरकारने येथे लोकांच्या प्रवेशावरच बंदी घातली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.