For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अश्रूंचे खोरे म्हणवून घेणारे स्थळ

06:21 AM Dec 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
अश्रूंचे खोरे म्हणवून घेणारे स्थळ
Advertisement

आइसलँडमध्ये सिगोल्डुग्लजुफर खोरे एक अद्भूत ठिकाण असू याला अश्रूंचे खोरे (व्हॅली ऑफ टियर्स) असेही म्हटले जाते. हे सळ आइसलँडिक हायलँड्समध्ये आहे. हे स्वत:च्या झऱ्यांच्च्या विशाल संख्येमुळे सर्वाधिक लोकप्रिय आहे. याचमुळे याला ‘अश्रूंचे खोरे’ हे टोपणनाव मिळाले आहे. हे खोरे स्वत:च्या जादुई दृश्यासाठी देखील ओळखले जाते. हे दृश्य पाहण्यासाठी लोक दूरदूरवरुन येत असतात. आता याच्याशी निगडित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सिगोल्डुग्लजुफर आइसलँडिक हायलँडसमध्ये असलेले एक छोटेसे खोरे आहे. हे ठिकण स्वत:च्या अनेक झरे, निळ्या रंगाचे पाणी आणि मोठ्या प्रमाणातील वनस्पतींसाठी प्रसिद्ध आहे.

Advertisement

अश्रूंच्या खोऱ्याला आइसलँडमध्ये लपलेल्या रत्नांपैकी एक मानले जाते. हे ठिकाण पाहताना जणू ते काल्पनिक असावे असा भास होतो. हे ठिकाण स्वत:च्या अनेक झऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. वाहते पाणी, मोठ्या प्रमाणात असलेले वृक्ष आणि लावा परिदृश्य या खोऱ्याला पर्यटकांसाठी अविश्वसनीय ठिकाणाचे स्वरुप मिळवून देते. परंतु हे कुठल्याही प्रकारे आइसलँडच्या अन्य खोऱ्यांइतके मोठे नाही तरीही स्वत:च्या अद्वितीय सौंदर्याने या ठिकाणाने हजारो पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सिगोल्डुग्लजुफुर खोऱ्याला केवळ उन्हाळ्यात भेट दिली जाऊ शकते. सर्वसाधारणपणे मे महिन्यापासून ऑगस्टपर्यंत येथे पोहोचण्यासाठी चारचाकी वाहनाची गरज भासते. खोऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी ओबडधोबड रस्त्यांवरून प्रवास केल्यावर पायी देखील चालावे लागते. याचमुळे अद्याप मोठ्या संख्येत येथे पर्यटक पोहोचत नाहीत.

Advertisement

Advertisement
Tags :

.