बेंचवर चार्ज होतो फोन चीनमधील अद्भूत तंत्रज्ञान
जगातील अनेक देश विविध कारणांमुळे चर्चेत असतात. काही देश तेलाच्या विहिरींमुळे तर काही देश घनदाट जंगलांमुळे प्रसिद्ध आहेत. पण काही देश विज्ञान किंवा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगतीमुळे ओळखले जाते. चीन याच क्षेत्रात इतर देशांपेक्षा आघाडीवर आहे. या देशात तुम्हाला रस्त्यांवर चालताना अशाप्रकारचे तंत्रज्ञान दिसून येईल, जे पाहून तुम्ही येथील लोक भविष्यात जगत असल्याचे म्हणाल. चीनमधील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून यात एक अनोखा आविष्कार दिसून येतोय.
रस्त्याच्या कडेला तेथे काही बेंच तयार करण्यात आले असून ते सोलर पॉवरने युक्त आहेत. बेंचला अखेर सोलर पॉवरची गरज काय असा प्रश्न मनात येणे साहजिक आहे, परंतु या बेंचवर बसून लोक स्वत:चा मोबाइल फोन चार्ज करू शकतात.
व्हिडिओत महिला रोडच्या कडेला असलेल्या बेंचवर बसताच त्यातील लाइट चालू होते. मग एका बाजूला असलेल्या छिद्रावर ती स्वत:चा फोन ठेवते आणि कुठल्याही वायर किंवा सॉकेटशिवाय फोन चार्ज होऊ लागल्याचे दिसून येते. याचमुळे याला स्मार्ट सोलर पॉवर बेंच म्हटले जात आहे.
या व्हिडिओला 1 लाखाहून अधिक ह्यूज प्राप्त झाले आहेत. तर अनेक लोकांनी कॉमेंट केली आहे. जर मोबाइल चोरी झाला तर अशी विचारणा एका युजरने केली आहे. भारतात हा बेंच असता तर तोच गायब झाला असता अशी उपरोधिक टिप्पणी अन्य युजरने केली आहे.