पूर्वजांच्या काळातील कपडे घालणारा अवलिया
सोशल मीडियाच्या या काळात ट्रेंड्स दररोज बदलत असतात. तर ब्रिटिश इसम जॅक पिन्सेंटने विंटेज फॅशनला स्वत:चे जीवन केले आहे. तो केवळ स्वत:च्या पूर्वजांचे म्हणजेच 100-200 वर्षे जुने कपडे परिधान करतो. व्हिक्टोरियन स्टाइलचा कोट, वेस्टकोट आणि बूट्स तो वापरतो. जीन्स, टीशर्ट किंवा मॉडर्न कॅज्युअल वियरबद्दल त्याला मोठा द्वेष आहे, कारण हे कपडे असुविधाजनक असण्यासोबत आत्म्याला व्यक्त करण्याची संधी देत नसल्याचे त्याचे मानणे आहे. काही काळापूर्वी जॅक पिन्सेंटवर निर्मित लघूपट व्हायरल झाला होता. ज्यात जॅक स्वत:ची कहाणी व्यक्त करताना दिसून आला. लोक माझ्याकडे बघत असतात, परंतु हीच माझी ओळख असल्याचे जॅक सांगतो. या व्हिडिओने युट्यूब, इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवर कोट्यावधी ह्यूज मिळविले आणि जॅकचा संदेश सेल्फ एक्सेप्टेंस, सेल्फ एक्स्प्रेशन आणि काइंडनेस जगभरात पोहोचला.
जॅक पिन्सेंट हे पिन्सेंट टेलरिंग नावाने इन्स्टाग्रामवर सक्रीय असून ते लंडनमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांचे जीवन 18 व्या-19 व्या शतकातील फॅशनभवती घुटमळणारी आहे. पणजोबांच्या वॉर्डरोबमधून मिळालेल्या कपड्यांना ते सांभाळून ठेवतात. काही कपड्यांना त्यांनी रिस्टोर करविले आहे तर काही स्वत: शिवले आहेत. मॉडर्न क्लोथिंग फास्ट पॅशनची शिकार असून ती पर्यावरणाला नुकसान पोहोचवित असल्याचे त्यांनी म्हटले.
जॅक हे जीन्सला बेकार मानतात, तर टीशर्टला ‘स्लॉपी’ ठरवितात. याऐवजी सिल्क टाई, वूलन कोट आणि लेदर बेल्ट पसंत करतात. जेव्हा कधी ते बाहेर पडतात, तेव्हा लोक वळून वळून त्यांच्याकडे पाहतात, तर कधी प्रश्न विचारतात. कपड्यांमुळे जॅक पिन्सेंट यांना अनेक प्रकारच्या स्थितींना तोंड द्यावे लागते.