कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

150 वर्षांपर्यंत जगू शकणार माणूस

07:00 AM Nov 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एंटी-एजिंग औषधाची निर्मिती करत आहेत चीनचे वैज्ञानिक

Advertisement

चीनचे वैज्ञानिक एक असे औषध तयार करत आहेत, जे मानवी आयुष्य 150 वर्षांपर्यंत वाढवू शकते. हे औषध द्राक्षाच्या बीजातून निघणाऱ्या एका नैसर्गिक घटकावर आधारित आहे. या औषधाचे माणसांवर व्यापक परीक्षण आवश्यक असल्याचे काही वैज्ञानिकांचे सांगणे आहे. शेनझेनची बायोटेक कंपनी लॉनवी बायोसायन्सेस या औषधावर काम करत आहे. ही कंपनी एंटी-एजिंग औषध तयार करत आहे. या औषधाचा मुख्य घटक प्रोस्यानिडिन सी1 (पीसीसी1) आहे, जो द्राक्षांच्या बीजाच्या अर्कात आढळून येतो. हे औषध वृद्ध आणि कमकुवत पेशींना संपवून सुदृढ पेशींचे रक्षण करणार आहे, यामुळे मानवी आयुष्य मोठ्या प्रमाणात वाढू शकते, असा कंपनीचा दावा आहे.

Advertisement

उंदरांवर परीक्षण

हे संशोधन 2021 मध्ये नेचर मेटाबॉल्जिम नियतकालिकात प्रकाशित एका अध्ययनावर आधारित आहे. त्यात उंदरांवर परीक्षण करण्यात आले. पीसीसी1 ने उंदरांच्या वृद्ध पेशींना निवडक पद्धतीने नष्ट केले, तंदुरुस्त पेशींना वाचविले. यामुळे औषधाचे सेवन करणाऱ्या उंदरांचे सरासरी आयुर्मान 9 टक्क्यांनी वाढले. उपचार सुरू झाल्यावर आयुर्मान मोजल्यास हे प्रमाण 64.2 टक्के अधिक होते. या औषधाला ‘लॉन्गेविटी सायन्सचे होली ग्रेल’ असे कंपनीचे सीईओ यिप त्सझो यांनी संबोधिले आहे. स्वस्थ जीवनशैलीसोबत मिळून 150 वर्षांपर्यंत जगणे काही वर्षांमध्येच शक्य ठरणार आहे. कंपनी आता या तंत्रज्ञानाला माणसांसाठी गोळीच्या स्वरुपात तयार करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

अद्याप खूप काम शिल्लक

परंतु इतर वैज्ञानिक सतर्क आहेत, बक इन्स्टीट्यूट फॉर रिसर्च ऑन एजिंगच्या तज्ञांनी उंदरांवरील परीक्षणाचे निष्कर्ष चांगले आहेत, परंतु माणसांवर लागू करणे अवघड असल्याचे म्हटले आहे. ही प्रक्रिया जटिल आहे, औषधाची प्रभावशीलता आणि सुरक्षा सिद्ध करण्यासाठी मोठ्या आणि कठोर वैद्यकीय परीक्षणाची आवश्यकता आहे. माणसाचे कमाल वय वाढविण्याच्या दाव्यांना असाधारण संशोधनाचे पुरावे हवेत, असे तज्ञांचे मानणे आहे.

चीनमध्ये लॉन्गेविटी संशोधनाचा बोलबाला

चीनमध्ये दीर्घ आयुर्मानाच्या संशोधनाला राष्ट्रीय प्राथमिकता देण्यात आली आहे. सरकार आणि खासगी कंपन्यात यात मोठी गुंतवणूक करत आहेत. विज्ञान वेगाने पुढे जात असले तरीही 150 वर्षांचे आयुर्मान अद्याप स्वप्नच वाटते. जगभरात एंटी-एजिंग संशोधन वाढत असले तरीही यश प्राप्त होण्यासाठी वेळ लागणार असल्याचे चीनच्या वैज्ञानिकांचे सांगणे आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article