जिवंत माणसांचे मांस खाणारा पॅरासाइट
मेक्सिकोत आढळले 5086 रुग्ण
मेक्सिकोत मांस खाणाऱ्या स्क्रूवर्मच्या प्रकरणांमध्ये वेगाने वाढ होत आहे. हे स्क्रूवर्म प्राणी आणि माणूस दोघांसाठी गंभीर धोका ठरले आहेत. 17 ऑगस्टपर्यंत मेक्सिकोत प्राण्यांमध्ये याची 5086 प्रकरणे नोंद झाली आहेत. जुलैच्या तुलनेत हे प्रमाण 53 टक्के अधिक आहे. ही वृद्धी चिंताजनक आहे, खासकरून उन्हाळ्याच्या स्थितीत स्थिती नियंत्रणात येत नसल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. बहुतांश प्रकरणे गायींमध्ये आढळून आली आहेत, परंतु श्वान, अश्व आणि मेंढ्यांमध्येही संक्रमण दिसून आले. 2023 पासून सुरु झालेल्या या प्रकोपाने मध्य अमेरिकेपासून उत्तरेच्या दिशेने फैलाव केला अहे. आता हे अमेरिकेच्या सीमेनजीक पोहोचले आहे.
स्क्रूवर्म एक पॅरासाइट असून त्याचे वैज्ञानिक नाव न्यू वर्ल्ड स्क्रूवर्म आहे. हे उष्ण रक्त असलेल्या प्राण्यांच्या (गाय, मेंढी, श्वान, अश्व अन् माणूस) घावांमध्ये शेकडो अंडी देते. अंडी फूटल्यावर लार्वा निघतो, जो स्वत:च्या तेज, हुकसारख्या मुखाद्वारे जिवंत मांसात शिरतो. हे लार्वा मांस खातात, घावाला मोठे करतात, उपचार न झाल्यास प्राणी किंवा माणसाचा मृत्यू होऊ शकतो. लार्वाचे नाव स्कूवर्म आहे, याचमुळे पडले कारण, ते मांसात घुसताना स्क्रूप्रमाणे वाटतात.
फैलावाची पद्धत : मादी माशा घाव, नाक, डोळे किंवा तोंडानजीक अंडी देतात. उन्हाळ्यात हे वेगाने फैलावतात. 2023 मध्ये मध्य अमेरिकेपासून (पनामा, कोस्टारिका, होंडुरास, ग्वाटेमाला इत्यादी) सुरू होत हे मेक्सिकोत पोहोचले. आता हे उत्तरेच्या दिशेने वाढत आहे.
उपचार : घाव साफ करणे, लार्वा काढणे आणि एंटीबायोटिक्स देणे आवश्यक, विलंब झाल्यास संक्रमण घातक ठरते.
अमेरिकेच्या कृषी विभागानुसार हा पॅरासाइट दक्षिण अमेरिकेत सामान्य आहे, परंतु 1960 च्या दशकात अमेरिका आणि मेक्सिकोतून संपविण्यात आला होता, आता पुन्हा परतला आहे.
प्रकरणांमध्ये वृद्धी अन् कारण
जुलै महिन्यात संख्या कमी होती, परंतु ऑगस्टपर्यंत हे 53 टक्क्यांनी वाढले आहे. एकूण 5086 प्रकरणांपैकी 649 सक्रीय आहेत. बहुतांश प्रकरणे दक्षिण मेक्सिकोच्या चियापास राज्यात असून येथे 41 व्यक्ती या पॅरासाइटमुळे आजारी आहेत असे मेक्सिको सरकारच्या आकडेवारीतून कळते. मेक्सिकोला या पॅरासाइटमुळे मागील वर्षी 1.3 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. मुख्यत्वे पशू निर्यात थांबल्यामुळे फटका बसला आहे.
प्रभाव : प्राणी, माणूस आणि अर्थव्यवस्थेवर
स्क्रूवर्मचा प्रभाव भयानक आहे, हे पशूधन आणि वन्यजीवांना उद्ध्वस्त करते.
प्राण्यांवर : बहुतांश प्रकरणे गायींमध्ये. लार्वा मांस खाऊन प्राण्यांना कमजोर करते, ज्यामुळे मृत्यू होतो. मेक्सिकोत पशूधन उद्योग प्रभावित, फैलाव झाल्यास अमेरिकेत टेक्सासला 1.8 अब्ज डॉलर्सचे नुकसान होऊ शकते.
माणसांवर : दुर्लभ परंतु घातक. मेक्सिकोत 41 रुग्ण बहुतांश चियापासमध्ये अमेरिकेत पहिला रुग्ण 4 ऑगस्टला नोंद. हा इसम एल साल्वाडोर येथून परतला होता. या इसमावर उपचार करण्यात आले.
अर्थव्यवस्थेवर : पशूनिर्यात थांबली, अमेरिकेत 100 अब्ज डॉलर्सचे पशूधन धोक्यात, मेक्सिकोत स्टेराइल फ्लाय फॅसिलिटी निर्माण होतेय.