महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ब्रिटनकडून 50 दशलक्ष पौंडचे पॅकेज

07:17 AM Nov 21, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पंतप्रधान ऋषी सुनक युक्रेनच्या दौऱयावर ः ब्रिटन सदैव पाठिशी राहणार

Advertisement

वृत्तसंस्था / कीव्ह

Advertisement

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक हे शनिवारी युक्रेनमध्ये पोहोचले. युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांची सुनक यांनी भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान त्यांनी युक्रेनच्या मदतीसाठी 50 दशलक्ष पौंडचे संरक्षणविषयक पॅकेज जाहीर केले आहे. तसेच ब्रिटनचा पाठिंबा कायम राहणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. स्वातंत्र्यासाठी लढण्याचा अर्थ काय असतो हे ब्रिटन जाणतो. आम्ही सर्वप्रकारे तुमच्यासोबत आहोत असे सुनक यांनी युक्रेनच्या जनतेला उद्देशून म्हटले आहे.

ब्रिटिश सरकारचे नेतृत्व स्वीकारल्यावर सुनक यांचा हा पहिला युक्रेन दौरा आहे. युक्रेनकरता जाहीर करण्यात आलेल्या संरक्षण पॅकेजमध्ये 125 विमानविरोधी  यंत्रणा, पिस्टल, रडार अन् ड्रोनविरोधी यंत्रणा सामील आहे. याचबरोबर रशियाच्या घातक ड्रोनला रोखण्यासाठीचे तंत्रज्ञान देखील ब्रिटनकडून उपलब्ध करण्यात येणार आहे. चालू महिन्याच्या प्रारंभी ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वालेस यांच्याकडून यापूर्वीच 1 हजारांहून अधिक विमानविरोधी क्षेपणास्त्रs पुरविली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.

जमीनदोस्त झालेल्या इमारती, शाळा आणि रुग्णालये पाहता सुनक यांनी मानवीय मदतही जाहीर केली आहे. जागतिक अन्न कार्यक्रमासाठी 12 दशलक्ष पौंडच्या मदत पॅकेजची घोषणा त्यांनी केली आहे. ब्रिटन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनला 1 दशलक्ष पौंडची मदत करणार आहे. तसेच जनरेटर, शेल्टर आणि पेयजल सुविधा आणि मोबाइल हेल्थ क्लीनिकसाठी निधी पुरविणार आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी झेलेंस्की यांच्यासोबतच्या भेटीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. झेलेंस्की यांची भेट घेतल्यावर सुनक यांनी कीव्हमध्ये उभारण्यात आलेल्या स्मारकाला भेट दिली आहे. युद्धादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या स्मरणार्थ हे स्मारक निर्माण करण्यात आले आहे. युक्रेनकडून युद्धादरम्यान पकडण्यात आलेल्या इराणी ड्रोनची त्यांनी पाहणी केली आहे. इराणी ड्रोनचा वापर रशियाने युद्धादरम्यान केला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article