महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ए. पी. सिंग यांच्याकडे हवाई दलाचा पदभार

06:48 AM Oct 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांच्याकडून स्वीकारली सूत्रे

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

वायुदलातील एक कुशल पायलट एअर मार्शल ए. पी. सिंग यांनी सोमवार, 30 सप्टेंबर रोजी भारतीय हवाई दलाचे नवीन प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांच्याकडून त्यांनी सूत्रे हाती घेतली. व्ही. आर. चौधरी आपला तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून निवृत्त झाले आहेत.

एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1964 रोजी झाला. 1 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांची हवाई दलाचे 47वे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी 1984 मध्ये हवाई दलात आपल्या कारकिर्दीला सुऊवात केली. ते 21 डिसेंबर 1984 रोजी एअर फोर्स अकादमी डुंडीगल येथून भारतीय हवाई दलात नियुक्त झाले. त्यांनी इस्टर्न एअर कमांडमध्ये वरिष्ठ हवाई अधिकारी म्हणून काम केल्यानंतर त्यांनी सेंट्रल एअर कमांडचेही नेतृत्व केले.

नॅशनल फ्लाईट टेस्ट सेंटरमध्ये ते प्रोजेक्ट डायरेक्टरही होते. त्यांच्याकडे तेजस लढाऊ विमानाच्या उ•ाण चाचणीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांनी नॅशनल डिफेन्स अकादमी खडकवासला आणि एअर फोर्स अकादमी डुंडीगल येथून प्रशिक्षण घेतले. ते डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टनचे माजी विद्यार्थी आहेत.

अनेक वर्षांचा अनुभव

एअर मार्शल अमर प्रीत सिंग हे भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख असतील, अशी घोषणा गेल्या आठवड्यात करण्यात आली होती. ते आतापर्यंत हवाई दलाच्या उपप्रमुख पदावर कार्यरत होते. त्यांना रोटरी विंग एअरक्राफ्टवर 5 हजार तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे. उपप्रमुख होण्यापूर्वी त्यांनी ऑपरेशनल फायटर स्क्वॉड्रन्स आणि फ्रंटलाइन एअर बेसचे नेतृत्वही केले आहे. ए. पी. सिंग यांनी वयाच्या 59 व्या वषी तेजस विमान चालवले होते. सर्वोत्कृष्ट कार्य व सेवेबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. 2019 मध्ये त्यांना ‘विशिष्ठ सेवा पदक’ तर 2023 मध्ये ‘परम विशिष्ठ सेवा पदक’ प्रदान करण्यात आले होते. आपल्या सुमारे 40 वर्षांच्या प्रदीर्घ आणि प्रतिष्ठित सेवेत त्यांनी विविध कमांड, कर्मचारी, निर्देशात्मक आणि परदेशात सेवा बजावली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article