For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑस्ट्रेलियन महिला संघाचा एकतर्फी मालिका विजय

06:37 AM Sep 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऑस्ट्रेलियन महिला संघाचा एकतर्फी मालिका विजय
Advertisement

सामनावीर जॉर्जिया वेअरहॅम : 26 धावा व 2 बळी, मालिकावीर अॅश्ले गार्डनर : मालिकेत 51 धावा व 4 बळी

Advertisement

वृत्तसंस्था / ब्रिसबेन

तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियन महिला संघाने न्यूझीलंडचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. या मालिकेतील झालेल्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर 5 चेंडू बाकी ठेवून 5 गड्यांनी विजय मिळविला. ऑस्ट्रेलियाच्या जॉर्जीया वेरहॅमला ‘सामनावीर’ तर अॅश्ले गार्डनरला ‘मालिकावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.

Advertisement

या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 146 धावा जमविल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 19.1 षटकात 5 बाद 148 धावा जमवित हा सामना 5 गड्यांनी जिंकला.

न्यूझीलंडच्या डावामध्ये जॉर्जीया प्लिमेरने 48 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 53 तर अॅमेलिया केरने 36 चेंडूत 5 चौकारांसह 40, सुझी बेट्सने 17 चेंडूत 3 चौकारांसह 19 आणि मॅडी ग्रीनने 5 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 12 धावा जमविल्या. न्यूझीलंडला 11 अवांतर धावा मिळविल्या. न्यूझीलंडच्या डावात 2 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे सदरलँड आणि वेअरहॅम यांनी प्रत्येकी 2 तर मॉलिन्युक्स आणि गार्डनर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. न्यूझ्^ााrलंडने पहिल्या 10 षटकात 1 बाद 62 धावा जमविल्या होत्या. न्यूझीलंडचे शतक 88 चेंडूत फलकावर लागले तर प्लिमेरने 47 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह अर्धशतक नोंदविले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये कर्णधार हिलीने 29 चेंडूत 3 चौकारांसह 27, बेथ मुनीने 1 चौकारांसह 6, जॉर्जीया वेअरहॅमने 16 चेंडूत 16 चेंडूत 4 चौकारांसह 26, एलीस पेरीने 29 चेंडूत 5 चौकारांसह 36, गार्डनरने 26 चेंडूत 5 चौकारांसह 33 धावा जमविल्या. लिचफिल्ड आणि मॅकग्रा यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण करताना अनुक्रमे नाबाद 5 व नाबाद 6 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 20 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियाने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 46 धावा जमविताना 1 गडी गमविला. ऑस्ट्रेलियाचे अर्धशतक 40 चेंडूत तर शतक 73 चेंडूत फलकावर लागले. न्यूझीलंडतर्फे कार्सनने 2, तर जोनास, रोवे आणि अॅमेलिया केर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक: न्यूझीलंड 20 षटकात 6 बाद 146 (प्लिमेर 53, अॅमेलिया केर 40, बेट्स 19, ग्रीन नाबाद 12 अवांतर 11, सदरलॅंड आणि वेअरहॅम प्रत्येकी 2 बळी, मॉलिन्युक्स, गार्डनर प्रत्येकी 1 बळी), ऑस्ट्रेलिया 19.1 षटकात 5 बाद 148 (हिली 27, मुनी 6, वेअरहॅम 26, पेरी 36, गार्डनर 33, लिचफिल्ड नाबाद 5, मॅकग्रा नाबाद 6, अवांतर 9, कार्सन 2-29, जोनास, रोवे, केर प्रत्येकी 1 बळी)

Advertisement
Tags :

.