पुरग्रस्त कृती समितीच्या वतीने पंचगंगा पुलाजवळ एकदिवसाचे ठिय्या आंदोलन
पुलाची शिरोली प्रतिनिधी
पुलाची शिरोली येथे पुणे बंगलूर राष्ट्रीय महामार्गाचे भरावा टाकून सुरू असलेले काम तात्काळ थांबवून पिलर बांधून काम सुरू करावे. यामागणीसाठी पूरग्रस्त कृती समितीच्या वतीने रविवारी पंचगंगा पुलाजवळ एकदिवसाचे ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी बाजीराव खाडे यांनी पुलाची शिरोली सांगली फाटा ते उचगाव पुल दरम्यान रस्ता बांधणी भरावा टाकून करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय महामार्गा रस्ता भरावामुळे कोल्हापूर शहरासह त्यामागील सुमारे पन्नास खेड्यांची पुराच्या पाण्यामुळे होणारी दयनिय अवस्था अधिकाऱ्यांना सांगितली. तसेच त्यांनी या रस्त्याबाबतचा कृती आराखडा सर्व लोकप्रतिनिधी समोर सादर करावा. मगच या रस्त्याचे काम सुरू करावे अशी मागणी केली. शिवसेना जिल्हा उपप्रमुख बाजीराव पाटील म्हणाले या रस्त्याची बांधणी करताना पिलर पुल करून रस्ता करावा .अशी सर्वपक्षीय बैठकीत मागणी केली आहे. याबाबत रस्ते विकास प्राधिकरण , जिल्हाधिकारी,पालकमंत्री यांचे लक्ष वेधले आहे. पण खर्च वाढतो म्हणून केंद्रीय रस्ते बांधणीविभाग, मंत्री , अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. पण आमचा हा जिवन मरणाचा प्रश्न आहे त्यामुळे हि मनमानी आता खपवून घेतली जाणार नाही. असा इशारा पाटील यांनी दिला. व या पिलर पुलासाठी लागेल तो निधी लावून काम तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी त्यांनी केली. तसेच याची पूर्तता न केल्यास तीव्र जनआंदोलन उभा करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील( आबाजी ), करवीर चे माजी सभापती बी.एच पाटील, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, मार्केट कमिटी सभापती भारत पाटील- भुयेकर पुलाची शिरोली सरपंच सौ. पद्मजा करपे, शिये सरपंच सौ. शितल मगदूम, वरणगे पाडळी सरपंच शिवाजीराव गायकवाड, शिरोली दुमालाचे सरपंच सचिन पाटील, वडणगे माजी सरपंच सचिन चौगले,हंबीरराव वळके,जयसिंग पाटील यासह सुमारे ४० पूरग्रस्त गावातील सरपंच उपसरपंच, सदस्य व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.