For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राफेलमधून डागले अण्वस्त्रवाहू क्रूज क्षेपणास्त्र

07:00 AM May 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
राफेलमधून डागले अण्वस्त्रवाहू क्रूज क्षेपणास्त्र
Advertisement

फ्रान्सकडून क्षेपणास्त्राचे परीक्षण

Advertisement

वृत्तसंस्था /पॅरिस

फ्रान्सने आकाशातून जमिनीवर मारा करणाऱ्या अण्वस्त्राहू क्रूज क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले आहे. अपग्रेडेड एएसएमपी आर सुपरसोनिक आण्विक क्षेपणास्त्राला फ्रान्सच्या राफेल लढाऊ विमानातून एका उ•ाणादरम्यान प्रक्षेपित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. फ्रान्सचे संरक्षणमंत्री सेबेस्टिय लेकॉर्नू यांनी यशस्वी परीक्षणावर संबंधित यंत्रणांचे अभिनंदन केले आहे. दीर्घकाळापासून नियोजित ही मोहीम आमच्या आण्विक प्रतिरोधिक क्षमतेसाठी सैन्य कार्यक्रम कायद्यात प्रदान करण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षेला साकार करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या परीक्षणाला ऑपरेशन डूरंडल नाव देण्यात आले होते. हे परीक्षण फ्रान्सची आकाशातून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची क्षमता वाढविणे, अत्याधुनिक एएसएमपीए-आर सिस्टीमची विश्वसनीयता सिद्ध करण्यात मैलाचा दगड आहे. एअर-सोल मीडियर रेंज (एएसएमपी) क्षेपणास्त्र आकाशातून जमिनीवर मारा करणारे मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र असून ते युरोपची बहुराष्ट्रीय कंपनी एमबीडीए फ्रान्सने विकसित केले आहे. क्षेपणास्त्राची नवी आवृत्ती एअर-सोल मीडियर रेंज-एमेलियोर (एएसएमपीए) मॅक 3 च्या वेगाने 500 किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेऊ शकते. या क्षेपणास्त्राला 300 किलोटनच्या थर्मोन्युक्लियर हवाई अण्वस्त्राने युक्त केले जाऊ शकते. एएसएमपीएचा ऑक्टोबर 2009 मध्ये मिराजसोबत तर जुलै 2010 मध्ये राफेलसोबत फ्रान्सच्या सैन्याच्या ताफ्यात समावेश झाला होता. फ्रेंच वायुदल आणि अंतराळदलांना एकूण 54 एएसएमपी-ए क्षेपणास्त्रs पुरविण्यात आली आहेत.

Advertisement

भारताकडेही राफेल

फ्रान्सने एएसएमपीए क्षेपणास्त्र  राफेलद्वारे डागले असून ते दोन इंजिन असलेले लढाऊ विमान आहे. राफेल विमानांचा वापर भारत देखील करतो. भारताकडे सध्या 36 राफेल लढाऊ विमाने आहेत. फ्रान्स जगातील मान्यताप्राप्त अण्वस्त्रसज्ज देशांमध्ये सामील आहे. फ्रान्सकडे सुमारे 290 अण्वस्त्रs असून देखभाल आणि आधुनिकीकरणाच्या प्रयत्नांमुळे ही संख्या काही प्रमाणात बदललेली असू शकते.

Advertisement
Tags :

.