कर्मचाऱ्यांदरम्यान नवा ट्रेंड
काम करण्यासाठी अजब मार्ग
प्रत्येक विकसनशील देश स्वत:ची अर्थव्यवस्था अधिकाधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असतो. याकरता परस्परांच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात कंपन्या स्वत:च्या कर्मचाऱ्यांवरील दबाव वाढवितात. सध्या काही आशियाई देशांमध्ये याचा दुष्परिणमा टॉक्सिक वर्क कल्चर म्हणून समोर येत आहे.
ऑफिसमध्ये अधिक वेळापर्यंत आणि अधिक ऊर्जेसह काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये एक विचित्र ट्रेंड दिसून येत आहे. हा ट्रेंड तितकाच धोकादायक देखील आहे. दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये कर्मचारी अधिक वेळ काम करण्यासाठी मल्टीवाइमिन ड्रिप्स चढवत आहेत.
दक्षिण कोरिया आणि चीनच्या कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या युवांना अधिक कामासाठी जेव्हा थकवा आणि निरुत्साह वाटू लागतो, तेव्हा ते आराम करत नाहीत. त्यांनी याऐवजी एक अजब पद्धत अवलंबिली आहे. ते इंट्रोवेनॉस न्युट्रिए&ट थेरपीचा वापर करतात. सर्वसाधारण भाशोत ते व्हिटॅमिन लिक्विड डोजला ड्रिपद्वारे थेट स्वत:च्या नसांमध्ये पोहोचवित आहेत. ही पद्धत रुग्णालयात दाखल लोकांसाठी वापरली जाते. परंतु या देशांमध्ये कर्मचारी स्वत:च्या नसांमध्ये ऊर्जा निर्माळा करण्यासाठी लिक्विड डोज टाकत आहेत.
अत्यंत धोकादायक ट्रेंड
या ड्रिपची किंमत 1.5 हजारापासून 4 हजार रुपयांपर्यंत असते. एकदा ते लावून घेतल्यावर 40 मिनिटांपर्यंत ऊर्जा राहते. आठवड्यात एकदा याचा वापर करण्यास तेथे सांगितले जात आहे. याचे नाव सिंड्रेला, गार्लिक, प्लॅसेंटा ड्रिप्स म्हणून प्रसिद्ध झाले आहे. यात अँटीऑक्सिडेंट्सपासून व्हिटॅमिन सी, लाइपोइक अॅसिड आणि वेगवेगळ्या व्हिटॅमिन्स असतात.