चिलीमध्ये वाढतोय नवा धर्म
टेम्पल ऑफ सॅटनच्या अनुयायांमध्ये वाढ
चिली या दक्षिण अमेरिकेतील श्रीमंत देशात अस्थिरता फारच कमी दिसून येते. परंतु मागील काही दिवसांमध्ये येथे एक नवा धर्म तयार होत आहे. टेम्पल ऑफ सॅटन-सॅटानिस्ट अँड लूसिफेरियन्स ऑफ चिली नावाने धार्मिक समूह तेथे अस्तित्वात आला आहे. सुमारे 2 कोटी लोकसंख्या असलेला देश चिलीमध्ये 70 टक्के कॅथोलिक ख्रिश्चन आहेत. यानंतर 20 टक्क्यांच्या आसपास पोटेस्टेंट आहेत. याचबरोबर ख्रिश्चन धर्माच्या काही आणखी शाखा येथे आहेत. चिलीमध्ये ज्यूंची एक छोटी लोकसंख्या देखील वास्तव्यास आहे. पाश्चिमात्य देशांप्रमाणे येथे अन्य धर्माचे लोक दिसून येत नाहीत. देशात सुमारे 2 टक्के लोकसंख्या मुस्लीम आहे.
चिलीत मोठ्या संख्येत नास्तिक लोक देखील असून जे हळूहळू वेगळे रुप धारण करत आहेत. हे लोक सॅटनिक रिलिजनच्या दिशेने वळू लागले आहेत. चिलीची राजधानी सँटियागोमध्ये टेम्पल ऑफ सॅटन स्थापन झाल आहे. आता हा समूह सरकारकडून धार्मिक संस्था म्हणून मान्यता मिळवू पाहत आहे. स्वत:च्या नावाच्या उलट टेम्पल ऑफ सॅटल अनुयायांना सैतानाची पूजा करण्यास सांगत नाही. हा एक पुराणमतवादी मानसिकता मोडण्याची एक पद्धत असल्याचा दावा करण्यात येतो. यात पुस्तकांचे प्रकाशन, पोलीस अधिकारी, वकील आणि डॉक्टर यासारखे लोक सामील असून ते वेगळा धर्म अनुसरत आहेत.
टेम्पल ऑफ सॅटनचा सदस्य होण्यासाठी अर्जदारांना मोठ्या प्रक्रियेला सामोरे जावे लागते. याच्या अंतर्गत अर्ज भरण्यापासून मुलाखत देखील सामील आहे. अनुयायी म्हणून मान्यता मिळविण्यासाठी लोकांची कुठल्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी असू नये. यानंतर संबंधिताची सायकोलॉजिकल टेस्ट घेतली जाते. सर्वकाही योग्य दिसून आले तरच तो या धार्मिक समुहाचा हिस्सा ठरू शकतो.
सदस्यत्व प्राप्त झाल्यावर संबंधित व्यक्ती स्वत:साठी एक नवे नाव देखील निवडू शकतो. परंतु हे अनौपचारिक असेल आणि केवळ धार्मिक समुहातच वापरले जाणार आहे. टेम्पल ऑफ सॅटनचा पाया 2021 मध्ये रचण्यात आला होता, परंतु याच्या अटीमुळे अनेक लोकांना याचे सदस्यत्व मिळविता आले नव्हते. आता प्रभावशाली पदांवर असलेल्या याच्या अनुयायांनी मिनिस्ट्री ऑफ जस्टिसकडून धार्मिक संस्था म्हणून मान्यता मिळविण्याचा प्रयत्न चालविला आहे.
चिलीमध्ये नव्या धर्माला धार्मिक संस्था म्हणून मान्यता मिळविण्यासाठी सरकारकडे अर्ज करावा लागतो. तेथील घटनेत धार्मिक स्वातंत्र्याची हमी आहे, तरीही कुठल्याही नव्या धार्मिक संस्थेला सरकारकडून मंजुरी मिळविणे आवश्यक आहे. याच्या अंतर्गत धार्मिक संस्थेला औपचारिक अर्ज दाखल करावा लागतो, ज्यात स्वत:च्या स्थापनेचा उद्देश अन् कार्यक्रम सांगावा लागतो. तसेच अन्य कुठलेही धर्म किंवा व्यवस्थांना धोका निर्माण होणार नसल्याचे स्पष्ट करावे लागते.